
शिवसेना व शिवप्रेरणा फाउंडेशन आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करियर मार्गदर्शन २०२२ वसई मधील समाज मंदिर हॉल येथे संपन्न झाला तसेच वसईतील कला-क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व वसईचे नाव देशभरात उंचावलेल्या मुला-मुलींचा देखील विशेष सन्मानचीन्न देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमास वसईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षांमध्ये भरघोस गुण मिळवून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आणि आपल्या अथक परिश्रमातून घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक आपुलकीची थाप देण्याच कार्य काल शिवसेना व शिवप्रेरणा फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस योग्य ते मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात वसईतील सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक – प्रकाश अल्मेडा सर ( करियर मार्गदर्शक)
सुभाषजी गोंधळेसर( सुप्रसिद्ध चित्रकार व सल्लगार)
श्री.भूपेश कोचरेकर सर (ब्रिलियंट इंजिनिअरिंग क्लासेस प्रमुख) , सौ.करवालो मॅडम( प्राध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज) इत्यादी सर्व मान्यवरांच्या मार्फत विद्यार्थी आणि पालकांचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.पंकज देशमुख , (शिवसेना वसई विरार जिल्हा प्रमुख),
श्री.विवेक पाटील (जिल्हा सचिव)
श्री.शंकर बने (ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख) , सौ. किरण चेंदवणकर (महिला आघाडी जिल्हा महिला संघटक ) तसेच श्री राजाराम बाबर (वसई तालुका प्रमुख) ,
श्री.नितीन म्हात्रे साहेब (समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन व सहकार जिल्हा संघटक) ,शिवसेना उपशहर प्रमुख श्री.निलेश भानुषे, हे सर्व उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्ग यांच्यामार्फत या स्तुत्य कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले आणि शिवसेना व शिवप्रेरणा फाउंडेशन यांच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम होत राहोत अशा अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष,शिवसेना विभाग प्रमुख श्री.प्रशांत कदम व श्री. योगेश पाटील कार्याध्यक्ष व सचिव शिवप्रेरणा फाउंडेशन,मा.वसई तालुका संघटक यांच्यामार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ह्रितिक शिंदे – शिवप्रेरणा फाऊंडेशन कार्यकारी सदस्य ,युवा सेना शहर अधिकारी ,व विशेष सहकार्य श्री विजय सोनावणे सहसचिव शिवप्रेरणा फाउंडेशन व श्री.जयेश राऊत,उपसरपंच श्री. अजय म्हात्रे, श्री चंद्रकांत कोलते शाखाप्रमुख,श्री कुणाल बोराणा युवासेना वसई शहर समन्वयक, साहिल भास्कर विभाग अधिकारी व शिवप्रेरणा फाउंडेशन चे सर्व सदस्य, कमलेश कांदू, जगदीश कलनुर, अनिल गुप्ता, राज राऊत आदी सर्व उपस्थित होते,सदर कार्यक्रम हा समाज मंदिर हॉल येथे संध्याकाळी ०४:०० ते ०८:०० या वेळेत संपन्न झाला.