

वसई विरार शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी श्री तब्बूसुम काझी, सौ स्मिता भोईर यांचाकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची माहिती वेळेवर महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्याकडे पोहचत नसून त्यामुळे ओमनगर वसई पश्चिम येथे कोरोना रुग्ण सापडून २१ तास उलटले तरी तो परिसर सील करण्यात आला नाही किंवा त्या ठिकाणी औषध फवारणी देखील झाली नाही सदर रुग्णाबाबत एच प्रभागाचे सहायक आयुक्त अनभिज्ञ होते या अतिशय गंभीर घटनेवर आयुक्त श्री गंगाधरण , मनाळे, व जिल्हा समनव्य डॉ मिलिंद चव्हाण हे गंभीर नसून या २१ तासात कित्येक नागरिक त्या परिसरात येजा करत होते या परिसरात कोरोनाचा फैलाव झाला तर त्याला जबाबदार कोण ?
ज्या कोरोनाबाधित रुग्णाचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आले आहेत तत्यांची नावे देखील पॉझिटिव्ह रुग्णाचा यादीत समाविष्ट करण्याचे प्रताप वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून झाले आहेत. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना वेळेवर जेवण मिळत नसून एकाच जारमधून पॉझिटिव्ह,निगेटिव्ह आणि अहवाल येणे बाकी आहे अशा रुग्णाना पाणी प्यावे लागत आहे ही बाब अतिशय गंभीर असून रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शहरात कोरोना रुग्णासाठी अतिरिक्त बेड वाढवण्याची आवश्यकता असताना जाणीवपूर्वक रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या फायद्यासाठी अंतिम अहवाल येण्यापूर्वी रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून तो खर्च रुग्णाने करावे यासाठी महानगरपालिका पालिकेची वैद्यकीय अधिकारी त्या रुग्णाला भरीस घालण्याचे काम केले जात आहे असा आरोप शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.
महानगरपालिकच्या या बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण हे दिनांक २२ मे रोजी घरातच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.
शहरातील नागरिकांनी देखील आपल्या सोयीनुसार एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण प्रशासनावर दबाव तयार करावा असे आवाहन केले आहे.