
सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत वसई मधील ही नागरिकांची जबाबदारी ही वसई – विरार शहर महानगरपालिका यांच्या वर येते, परंतु ह्या महानगर पालिकेचा अहंपणा व निष्काळजीपणा इतका वाढलाय की ते नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत, तसेच आपला परिसर निर्जंतुक करण्याविषयी विचारले असता तेथील काही अधिकारी म्हणतात की “आम्ही फक्त कोरोना रुग्ण जिथे आढळतो तोच परिसर फक्त निर्जंतुक करतो” अशा कठीण परिस्थितीत येथील नागरिकांनी काय करावे हा मोठा प्रश्न होता अशा वेळी जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळी नेहमीच शिवसेना खंबीर असते.. “८०% समाजकारण व २०% राजकारण” अशा बाळासाहेबांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन व कोरोना विरुद्धच्या युध्दात सामील होण्याच्या मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, आपली सुरक्षा आपल्याच हाती हा विचार करून वसई शहर येथील शिवसेना विभाग प्रमुख तथा उप कक्ष प्रमुख श्री राहुल प्रल्हाद कांबळे, कक्ष प्रतिनिधी श्री अजिंक्य घरत व श्री परमहंस भारद्वाज हे तीन वीर या भयानक कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी आपल्या दर्जी आळी, घाटे आळी, दिपमाळ, कोर्ट नाका व वाल्मिकी नगर कोळीवाडा विभागातील सोसायटी, चाळी इत्यादी ठिकाणी निर्जंतुक औषध फवारणी ही स्व: खर्चाने करून ह्या वीरांनी सामाजिक भान ठेवून आपले औदार्य दाखविले, आणि अजूनही बऱ्याच विभागात निर्जंतुक औषध फवारणी करणार आहेत; हे तेच विर आहेत ज्यांनी अशा कठीण प्रसंगी शासना च्या लॉक डाऊन नियमांचे पालन करीत, आपल्या जीवाची पर्वा न करता जोखीम उचलून आपल्या खांद्यावर औषध फवारणी मशीन घेऊन काम करीत आहेत… अशा ह्या वीरांना त्यांच्या ह्या समाजकार्याला सलाम..!!