
डोंबिवली, येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या महीला महाविद्यालयातील इतिहास विभागाने ६ जून २०२१ रोजी ऑनलाईन “शिवस्वराज्य दिन” समारंभाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठातील इतिहास अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. संदेश वाघ यांना आमंत्रित केले होते. त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे आमंत्रण स्वीकारून आजच्या दिनाचे उचित विवेचन आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात केले. याप्रसंगी ते म्हणाले की, छत्रपती ही पदवी धारण करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. रयतेच्या कल्याणासाठी छत्र हाती घेवून खऱ्या अर्थाने सुराज्य निर्माण करणारे ते मानवतावादी राजे होते. त्यामुळेच शिव स्वराज्य म्हणजे नव्या युगाची निर्मिती होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या दिड तासांच्या व्याख्यानात त्यांनी, स्वराज्याच्या पार्श्वभूमी पासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा घटनाक्रम पी पी. टी.द्वारे , विविध नामवंत इतिहासकारांच्या संशोधनाचे दाखले देत मांडला. तसेच शिवस्वराज्याचा आदर्श आजही कसा महत्त्वाचा आहे, याबद्दल ओघवत्या शैलीत विवेचन केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरुण अहिराव होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, महापुरुषाचे कर्तुत्व प्रेरणा देणारे असते. त्यामुळे त्यांचे विस्मरण होऊ नये यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच आजच्या दिनाचे महत्त्व “पताका हिंदवी स्वराज्याची” या स्वरचित गीताद्वारे सुरेल आवाजात सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. किशोर काजळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील कु.ज्योती गुप्ता, रजनी शर्मा, संध्या जैसवार, प्रिया पांडे, अश्विनी खाणे, भावना पाटील या विद्यार्थिनीनी आपली मनोगते मांडली.
सदर समारंभामध्ये संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे इतिहास अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इतिहास अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय वाघ उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ.पुष्पलता देशमुख (मुंबई विद्यापीठ), डॉ.हेमलता मुकणे (एस. एन.डी. टी.विद्यापीठ), प्रा.कृष्णा गायकवाड (एल.जे.एन.जे. महाविद्यालय विलेपार्ले), डॉ. राजनंद पट्टेबहादुर अशा विद्वान अभ्यासकासमवेत महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सुनील पवार, प्रा.सुनील घाडगे, ग्रंथपाल संकल्प गजबे, वरिष्ठ लिपिक अशोक शिंदे, इतर कर्मचारी व स्नातक – स्नातकोत्तर विभागाच्या विद्यार्थिनी समवेत महाराष्ट्रातील अनेक अभासू उपस्थित होते. प्रा. भूषण हिरभगत यांनी प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला तर डॉ. किशोर काजळे यांनी सर्वांचे आभार महाविद्यालयालाकडून व्यक्त केले.