दिनाक 20 फेब्रुवारी रोजी नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था जिल्हा पालघर तालुका वसई कोकणी मालवणी सामाजिक संस्था विरार ज्येष्ठ नागरिक संघ विरार श्री शांतादुर्गा फाऊंडेशन विरार यांच्या संयुक्त विद्यमाने 20फेब्रुवारी रोजी विद्या विहार विहार हायस्कूल विरार इथे शिवजयंती निमित्त समाजाप्रती काम करणाऱ्या 10 मान्यवरांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमती डॉक्टर मंगला परब मॅडम उपस्थिती होत्या तसेच श्रीमती आशिया रिझवी सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या श्रीमती वंदना पाटील सचिव मुंबई जिल्हा विशेष पाहुण्या होत्या यांनी अतंत्या सुंदर सोप्या भाषेत प्रश्न मंजुषा घेऊन उपस्थितांना प्रोत्साहित केले श्री बापू परब कोकण विभाग यांनी सूत्र संचलन केले पालघर जिल्हा अध्यक्ष श्री सत्यवान शिंदे उपाध्यक्ष श्री सुभाष जाधव वसई तालुका अध्यक्ष श्री संदेश राऊत वसई तालुका संघटक श्री चंद्रकांत नागरे साहेब उपस्थित होते पालघर जिल्हा सचिव श्रीमती सायली सावंत वसई तालुका अध्यक्षा श्रीमती मिताली साळुंखे सह निरीक्षक श्रीमती सुवर्णा दळवी वसई संघटक श्रीमती नयना वालावलकर श्रीमती साक्षी जाधव श्रीमती वैशाली पवार सदस्या तनुजा तोडकर यांनी जिजाऊ वेशभूषा केली होती तसेच सदस्या श्रीमती भाग्यश्री परब उपस्थित होत्या श्रीमती डॉक्टर मंगला परब मॅडम यांच्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *