

नालासोपारा ता.१५(प्रतिनिधी)
या शनिवारी,१८ जानेवारी रोजी नालासोपारा पुर्वेला भरणारा
श्रीनिवास मंगल महामहोत्सव हा उपक्रम केवळ दाक्षिणात्य धार्मिक विधी आणि पवित्र कार्य अशा स्वरुपाचा नाही तर तो पक्षीय आणि सर्व धर्मीय महामेळावा आहे. निमित्त आहे ते श्रीनिवास मंगल महोत्सवाचे.ज्यात प्रामुख्याने तिरुमला बालाजी
देवस्थानच्या भेटीला इच्छा व भक्तिभाव असूनही ज्यांना जाणे होत नाही, अशा भक्त-भाविकांना
अगदी तशाच देवदर्शनाचा, प्रसाद-महाप्रसादाचा लाभ अशा
मंगल महोत्सवाच्या माध्यमातून मिळावा. अनेकांची मन्नत असते, अनेकांना अभिषेक वा तूला विधी करायचे असतात.अशांसाठी हा मंगल महोत्सव एक संधी असते.
आणि ती संधी निर्माण करुन
देण्याचे काम आपण गेली सात वर्षे करत आहोत.
आणि प्रत्येक वेळी या मंगल महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळतो आहे.
या २०२० च्या मंगल महोत्सवाला सुद्धा किमान अडीच लाख भक्त-भाविक-उपासक आणि स्वयंस्फुर्तीने सेवा करणारे स्वयंसेवक यांचा सहभाग असेल असा विश्वास या मंगल महोत्सवाचे एक निमंत्रक आणि माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी आज येथे व्यक्त केला.
मंगल महोत्सवाच्या बाबत प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते.
तुळींज येथील उत्सव बॅंक्वेट हाॅलमधे ही पत्रकार परिषद झाली. उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.
मंगल महोत्सवाच्या आयोजनातील पदाधिकारी शेखर नाईक यांनी सुद्धा महोत्सवाचे स्वरुप अधिक तपशीलवार स्पष्ट केले. या वेळी शहरात निघणारी शोभायात्रा आणि मिरवणूक बघण्यासारखी असेल विषेत:
विविध प्रकारच्या वाद्यांचा वापर ऐकण्यासारखा असतो.
असे ते म्हणाले आणि पत्रकारांनी सहकुटुंब सहपरिवार यावे असे आवाहनही केले.
महोत्सवाची अधिक माहिती देताना उमेश नाईक पुढे म्हणाले की, आजवर विरार, वसई,बोईसर, मीरा भाईंदर,कल्याण डोंबिवली, नालासोपारा पश्र्चिम येथे
मंगल महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.
नालासोपारा या शहराला दुसऱ्यांदा हा मान मिळाला आहे.
नुसत्या दक्षिण भारतातच अनेक भाषा अनेक परंपरा आणि सांस्कृतिक विविधता आहे.
आता या कार्यक्रमात महाराष्ट्रा, गुजरात, राजस्थान,उत्तर भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणारी काही मंडळे,पथकं, वाद्यवृंद सहभागी होणार असल्याने खऱ्या अर्थाने हा महोत्सव बहुभाषिक, बहुरंगी आणि बहुगुणी भक्त भाविकांचा होईल.
१८ तारखेला या मंगल महोत्सवात सकाळी ७ते रात्री ९
या दरम्यान काय काय विधी आहेत याची माहिती या प्रेस नोट मधे नमूद करण्यात आली आहे.
आपण आपल्या वतीने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि योग्य अशी प्रसिद्धी द्यावी,हा कार्यक्रम घरोघरी पोहचविण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे अशी विनंती सुद्धा उमेश नाईक यांनी केली.
पत्रकार परिषदेत सुरुवातीला
महाराष्ट्राचे पहिले आॅलंपियन कुस्तीपटू पै.खाशाबा जाधव, माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली.
उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष राजेश पांड्ये उपस्थित असलेल्या या पत्रकार परिषदेत
माजी नगरसेवक अॅड. रमाकांत वाघचौडे यांनी पत्रकारांचे स्वागत केले. उमेश नाईक यांनी आभार मानले.