
शनिवार दिनांक 9 जानेवारी2022 रोजी श्री. संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर श्री कच्छी विना जैन संघाच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सर्व भजन संघाचे कार्यकर्ते व सर्वसाधारण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले यावेळी संघाचे अध्यक्ष वसंत प्रभू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून रक्तदानाचे महत्व सांगितले ज्या नागरिकांनी रक्तदान केले त्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी समाजसेवक प्रताप दुपारे युवाशक्ती एक्सप्रेसचे वरीष्ठ पत्रकार प्रज्योत मोरे , युवा कार्यकर्ते तेजस दुपारे ,दिवेश पटेल हे उपस्थित राहून सर्व आयोजकांचे अभिनंदन करून अध्यक्ष वसंत प्रभू सचिव जनार्दन धयालकर खजिनदार जयराम पवार उपाध्यक्ष शिवाजी पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तेजस दुपारे यांनी अश्या संख्यने आजच्या रोगराईच्या काळामध्ये रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन करून अश्या कामासाठी आम्ही आपणांस नेहमी मदत करून अश्या कामासाठी आम्ही आपणास नेहमी मदत करु असे आश्वासन केले विजया ब्लड बँकेचे विशेष सहकार्याने शिबिर पार पडले शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व पश्चिम रेल्वे भजन महासंघाचे अथक परिश्रम घेतले.