

दापोली(विशाल मोरे)- तालुक्यातील दाभीळ गावाची सुकन्या, शिव,शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेने प्रेरित झालेली कुणबी भगिनी शिवकन्या नम्रता मंगेश शिरकर यांची संघर्ष सागर वृत्तपत्राच्या दापोली तालुका प्रतिनिधी पदी नुकतीच नियुक्ती झाली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार हा शासन आणि जनता या दोघांमधील दुवा समजला जातो.जनतेची वास्तव स्थिती, समाजप्रबोधनपर माहिती, आपल्या जीवाची बाजी लावून धारदार लेखणीद्वारे निर्भिडपणे पत्रकार करत असतात. पत्रकार क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिला पत्रकार देखील उल्लेखनीय कार्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर दाभीळ गावाची सुकन्या शिवकन्या नम्रता शिरकर यांनी पत्रकार क्षेत्रात स्वःइच्छेने टाकलेले धाडसी पाऊल खरोखरच कौतुकास्पद असून महिला भगिनींसमोर आदर्शवत आहे. त्यामुळे शिवकन्या नम्रता शिरकर यांचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.