पुणे प्रतिनिधी : शंकर जोग

पुणे — संविधानाच्या मूल्यांचा आदर राखत, कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रती समानतेची वागणूक देणारे आदर्श IAS अधिकारी आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पंकज देवरे यांचा आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, पुणे शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष इंजि. पांडुरंग शेलार यांच्या हस्ते देवरे यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास नागेश गायकवाड, सुनील रोकडे, बालाजी धिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समानतेचा व लोकशाही मूल्यांचा आदर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून समाजात संविधाननिष्ठ कार्यपद्धतीचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *