
दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान कृती समिती च्या माध्यमातून अभिवादनाचा कार्यक्रम वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या बाजूला आयोजित करण्यात आले होते, टाळेबंदी काळात दादर चैत्यभूमी दादर या ठिकाणी भिम अनुयायी पोचू शकत न्हवते, त्यांना अभिवादन करण्यात पासून वंचित राहू नये या करिता सालाबादप्रमाणे याहिवर्षी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून महामानवाला अभिवादन केले. हा कार्यक्रम कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षाच्या वतीने नसुन कार्यक्रमाचे आयोजक संविधान कृती समितीचे पदाधिकारी, किर्तीराज लोखंडे ( बहुजन पँथर), गिरीश दिवाणजी (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), नितीन उबाळे (काँग्रेस), विशाल खैरे (समाजक्रांती सामाजिक संघटना), उदय तांबे (रिपाइं-आ), तसेच अविनाश कापसे, एकनाथ निकम, सुनील कांबळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिवादनाच्या कार्यक्रमाला वसई तालुक्याचे जेष्ठ समाजसेवक व शिक्षण महर्षी मा. विकास वर्तक , विरार पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सोनावणे तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती