
विरार- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी अभिवादनाचा कार्यक्रम विरार मधील विविध राजकिय पक्ष व संघटना यांनी एकत्र येऊन संविधान कृती समिती च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची सुरुवात वसई विरार शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सह संचालक श्री. सुरेश बनसोडे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. अभिवादन कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना श्री. सुरेश बनसोडे साहेब यांनी उपस्थितांना संबोधताना असे म्हटले की, संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार व कर्तव्य दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एका समाज्याचे न मानता त्यांनी केलेले देशाप्रती योगदान म्हणून त्यांचे महात्मे मोठे आहे.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव दिनेश कांबळे, विरार पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे साहेब, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष ओनील अल्मेडा, कार्याध्यक्ष, व त्यांचे पदाधिकारी, बहुजन समाज पक्ष्याचे प्रा. डी. एन. खरे सर व त्यांचे पदाधिकारी, समाजसेवक निर्भवने गुरुजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रमुख व बहुजन पँथर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे बहुसंख्येने उपस्थित होते या अभिवादन कार्यक्रमावेळी उपस्थितलोकसेवक यांना संविधानाची उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड. किर्तीराज लोखंडे यांनी विरार मध्ये मनवेलपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा तलाव व उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तलावाच्या मधोमध उभा करण्यात यावा व त्या तलाव परिसरामध्ये अभ्यासिका व वाचनालय यांची स्वतंत्र इमारत बांधण्यात यावी यासंदर्भात लवकारात लवकर महानगरपालिका व आंबेडकरी समाजाच्या प्रतिनिधीची बैठक सुरेश बनसोडे साहेब यांनी पुढाकार घेऊन बोलावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला गिरीश दिवाणजी यांनी अनुमोदन देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून मानवंदनेच्या कार्यमाचा शेवट करण्यात आला. कोरोनाच्या परिस्थिती मध्ये दादर चैत्यभूमी येथे गर्दी न करण्याचे आवाहन समिती तर्फे गेल्या आठवडाभर समाज माध्यमातून आवाहन केल्यामुळे बहुसंख जनता सकाळी १० ते रात्री ८ वाजे पर्यंत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा शेजारी उभ्या करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व कोरोना स्थितीचे नियम पाळून अभिवादन करण्यास उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संविधान कृति समितीचे समन्वयक


किर्तीराज लोखंडे (बहुजन पँथर पक्ष), गिरीश दिवाणजी (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) जितेंद्र जाधव (समाजसेवक) नितीन उबाळे (काँग्रेस),मनोज जाधव (बहुजन पँथर पक्ष), मनोज रुके (संघर्ष सामाजिक संघटना , पांडुरंग कासारे (काँग्रेस) अविनाश कापसे (समाजसेवक), विशाल खैरे (समाजक्रांती सामाजिक संघटना), नथुराम जाधव (भीमसैनिक). अंजना देवकांत( बार्टी), सुवर्णा जगताप मॅडम, एकनाथ निकम (बहुजन पँथर पक्ष), रिपाई चे भगवान कांबळे, अमर साळवे, मनोहर तांबे, व राहुल जाधव तसेच बहुजन पँथर पक्षाचे विजया रुखे मॅडम, सुनील कांबळे, बिपीन मोरे, सचिन मोहिते, श्रावणी लोखंडे, उपस्थित होते