
वसई (प्रतिनिधी) गुरुत्वाकर्षण मुळे पृथ्वी अढळ आहे जर गुरुत्वाकर्षण निघून गेल तर पृथ्वी भरकटुन जाईल तिचे असंख्य तुकडे होतील त्याच प्रमाणे देशाचा कारभार चालविणाऱ्या संविधानाला देशापासून बाजूला काढले तर देशाचेही अनेक तुकडे होतील, अराजकता माजेल इतके महत्व संविधानाला प्राप्त झाले आहे असे विधान ग्रंथालय शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ अरुण घायवट यांनी संविधान गौरव दिना निमित्त काढले. २६- नोव्हेंबर या संविधान गौरव दिनानिमित्त वसई-विरार भागात ठीकठिकाणी विविध कार्यक्रम झाले. समाजामध्ये संविधान साक्षरता वाढावी म्हणून सामाजिक समरसता मंचातर्फे वसई, नालासोपारा, विरार, निर्मळ येथे कार्यक्रम करण्यात आले. त्यात प्रामुख्याने आर.पी. वाघ हायस्कूल येथे दलित साहित्य अकादमी द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप तसेच “साहित्य श्री” आणि “उत्कृष्ट पत्रकार” असा पुरस्कार प्राप्त डॉ श्री अरुणजी घायवट यांनी आपले विचार मांडले. उद्देशिकेचे वाचन संध्या गायकवाड यांनी केले. त्याचप्रमाणे अनुसया विद्यालय, मनवेल पाडा, विरार पूर्व ,अर्नाळा आणि बोळींज येथील कार्यक्रमांमध्ये “ग्लोबल टीचर अवॉर्ड” ने सन्मानित तसेच “शिदोरी” या पुस्तकाच्या लेखिका आणि “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत योगदान” या पुस्तकाच्या संपादिका सौ निवेदिता मनोज मोहिते यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले.
हजारो वर्षापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने संविधानाचे महत्त्व आणि माहिती, शालेय मुलांपासून प्रौढांपर्यंत असायला हवी असं मत मांडलं. नालासोपारा पूर्वेला के.एम.पी.डी. विद्यालयात Adv. गणेश जाधव, L.L.M., (क्रिमिनल लॉयर) यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.Adv. मिनल शेलार यांनी शिवाजीनगर नालासोपारा पूर्वेला आपल्या सोसायटीत झालेल्या कार्यक्रमात सुंदर मार्गदर्शन केले. करोटी गाव येथिल कार्यक्रमात श्री adv. तुलसीदास गोळे यांनी विषय मांडला.याव्यतिरिक्त बोळिंज ,अर्नाळा येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला . हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यामागे श्री अरुण जी घायवट पत्रकार, श्री अंकित उपाध्याय, श्री शिवाजी माने जिल्हा समरसता संयोजक ,श्री राजेंद्र केंबळे ,श्री आदित्य कोदे, श्री आदित्य आजगावकर, श्री हेरंब बेटावदकर, श्री महेश कामत, श्री हिंदी जोशी ,श्री विश्वास पारटे,श्री विवेक वैद्य, श्री विश्वनाथ कसालकर, अजय मिस्त्री, श्री नीलेश सुर्वे, यांनी परिश्रम घेतले.
