

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – सत्तेच्या माध्यमातून NRC / CAA च्या संदर्भात देशात जे वातावरण निर्माण झाले आहे त्याअनुषंगाने भारतीय संविधान वाचवायचे आहे असे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड. विनोद निकोले यांनी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर सभा निमित्त आझाद मैदान येथे केले आहे.
यावेळी आमदार कॉम्रेड. विनोद निकोले म्हणाले की, आपण या मोदी सरकार च्या राज्या मध्ये “बेटी पढाओ, बेटी बचाओ” अशी घोषणा केली पण आता आपण पाहतोय देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. आज आपल्या देशातील महिला सुरक्षित नाही आहेत. रात्री तर सोडा दिवसा सुद्धा महिला फिरू शकत नाहीत. अशी परिस्थिती झाली आहे. सर्वात प्रथम आपल्यावर जवाबदारी असेल तर आपला देश ज्या संविधानावर चालतो. ते संविधान वाचवायचे आहे. जात, पात, धर्मावर भांडण लावले जातात. देशातील जनतेला एकता अखंड ठेवण्यासाठी फार मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे. रोजगाराच्या बाबत बघितले तर त्या ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. त्याअनुषंगाने महिला संघटन मजबूत करायचे आहे. देशात धर्मातर शक्ती बाजूला ठेवायची. राज्यात आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा निधी येतो पण तो महिलांना पाहिजे तशी सुविधा, आरोग्य सुविधा मिळत नाही. प्रसूती साठी सुद्धा महिलांची गैरसोय होते. अशा अनेक प्रश्नांवर सरकार वर जोरदार हल्ला निकोले यांनी यावेळी केला. तसेच निकोले म्हणाले की, मी आमदार होऊन या व्यासपीठावर उभा आहे त्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या आमच्या भागातील महिलांचा सिहाचा वाटा आहे. आज धर्मांतर शक्ती सत्तेत आहे त्यांनी ‘अच्छे दिन’ ची घोषणा केली होती पण अच्छे दिन तर नाहीच जे पूर्वी चे बुरे दिन होते त्या पेक्षा बेकार दिन आले आहेत. तसेच शेतकरी व कामगार अशा कष्टकरी जनतेला खोटे आश्वासन देऊन हे सरकार निवडून आले आहेत. पण आता या महिला या अधिवेशनातून नक्कीच सरकार बदलतील असे मला वाटते.
यावेळी मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश होता. सभेच्या सुरवातीला राज्य सचिव प्राची हातिवलेकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. राज्य अध्यक्षा नसीमा शेख सभेच्या अध्यक्ष होत्या. सभेला बृंदा कारत व सुभाषिनी अली या महिला चळवळीतील नेत्या, अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सिटूचे राज्य सचिव व नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले तसेच जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा, माजी खासदार मालिनी भट्टाचार्य व राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी संबोधित केले.