
विद्यार्थी व शिक्षकांनी सुमारे १५ हजार सीडबॉल तयार करून जंगलात टाकले.

(दि.१५ पालघर प्रतिनिधी – मनोज बुंधे.) सद्यस्थितीत पालघर मध्ये पाऊस हा हळुवार सुरू आहे.म्हणून पर्यावरण टिकविण्यास व निसर्गाच्या सानिध्यात मुलांना निसर्गाचे महत्व लक्षात यावे यासाठी केशवसृष्टी ग्राम विकास योजनेतील शिक्षण या आयमाचे प्रमुख कैलास कुरकुटे व वाडा, विक्रमगड, जव्हार,मधील ४१ माधव संस्कार केंद्रातील शिक्षक व मुलांनी मिळून १५ हजार जंगली झाडाच्या बिया गोळा करून सुकवलेल्या शेणाचा भुगा व माती असे मिश्रण करून सिड बॉल तयार करून ते अतिशय काळजीपूर्वक जंगलात टाकण्यात आले.
जंगली वृक्ष सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात नामशेष होण्याच्या मार्गावर असताना संस्कार केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे येवून निसर्गाशी केलेली ही मैत्री नक्कीच स्तुतियोग्य आहे.वाडा,विक्रमगड व जव्हार या तीन तालुक्यांतील ४१ माधव संस्कार केंद्रांनी प्रत्येकांनी जवळपास ५०० ते ७०० सीडबॉल तयार केले होते.व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी स्वतः ते जंगलात जावून टाकले,यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.माधव संस्कार केंद्र शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आज मोठ्या प्रमाणात जंगली झाडे वृक्ष संगोपन & संवर्धन करण्यात येत आहे यामध्ये केशवसृष्टी ग्राम विकास टीम चा मोलाचा वाटा आहे.