
नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना वसई तालुका सकल मराठा समाज संस्थेने पाठिंबा जाहिर केला आहे. संस्थेचे अध्यक्ष शिरीष चव्हाण, सचिव संजय पाटील आणि उपाध्यक्ष उदय जाधव यांनी पाठिंब्याचे पत्र गावडे यांना दिले आहे. उपाध्यक्ष उदय जाधव, सचिव संजय पाटील, कल्पेश सकपाळ, जयसिंग खबाले, लक्ष्मण पाटील यांनी गावडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.
सकल समाज कार्यकारिणीच्या मासिक बैठकीत धनंजय गावडे यांना जाहिर पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच समाजाच्यावतीने समाज बांधवांना गावडे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शिरीष चव्हाण, उपाध्यक्ष उदय जाधव, सचिव संजय पाटील यांनी दिली.
धनंजय गावडे नेहमीच मराठा समाजाच्या सोबत राहिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी पालघर जिल्हयात झालेल्या आंदोलनांमध्ये गावडे सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही गावडे यांनी सकल मराठा समाजाला दिली आहे.