

विरार (राजेश चौककर) : देशात कोरोनाचे संकट आल्यापासुन वसई तालुक्यात देखील रोज रूग्णांना रक्ताची गरज भासत असताना व रक्त पेढ्यांमध्ये असलेला रक्ताचा तुटवडा या विषयी गंभीर दखल घेत सकल मराठा समाज वसई तालुक्याच्या वतीने जि.प. शाळा मनवेलपाडा,विरार (पुर्व) येथे सरला रक्त पेढीच्या माध्यमातुन भव्य रक्तदान शिबीर तसेच इन्फिगो आय केअर सेंटर च्या माध्यमातुन भव्य नेत्र तपासणी शिबीर सकल मराठा बांधव उदय (दादा) जाधव, रामचंद्र मंडलिक, कल्पेश सकपाळ यांनी त्वरीत पुढाकार घेत विशेष आयोजन केले गेले.या रक्तदान शिबीराला समस्त जाती धर्मातील रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद देत जास्तीत जास्त रक्तदान करून आपली नेत्र तपासणी देखील करून घेतले.
रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलेले वसई तालुक्यातील मराठा नेते शिरीष दादा चव्हाण, रक्तदाते मराठा नेते विश्वास सावंत, अँड.धनंजय चव्हाण, पालघर समन्वयक प्रमोद जाधव, नवनाथ शिंदे, रत्नदीप बने, वैभव जाधव, तेजस पवार, हितेश जाधव, रक्तदाते श्रीकांत जाधव, रुपेश मांजरेकर या सर्व समाज मान्यवरांचे आभार या वेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारे मराठा बांधव सचिन पवार, भास्कर रावराणे, वैभव पालव, पंकज सावंत, निलेश तेलंगे, विशाल मंडलिक, प्रमोद विचारे, चंद्रकांत चाळके, प्रविण आयरे, लक्ष्मण मोहिते, बाळासाहेब कुरळे, चंद्रकांत सावंत, संजय चव्हाण, शरद नाईकधुरे, बबन तानवडे, महाडिक, राहुल सकपाळ, अक्षय भोसले, प्रतीक शिर्के, सुरज कदम, अक्षय साळुंखे, नितीन मुणगेकर, विनोद बोन्द्रे, दीपक बोन्द्रे, तानाजी मनगुटकर, विशाल सावंत(सर), शुभम सावंत, के.के.भालेकर, सतीश सावंत, रवी साखले, ओमकार कदम, संतोष सुर्वे, निलेश भद्रीके, रोहित कदम, राजेश वाघरे तसेच इतर सर्व समाज बांधव आणि काही कारणास्तव शिबिरा मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला त्या सर्व बांधवांचे आभार मानण्यात आले.