
सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे लक्षात घेऊन भारत सरकारने देखील आपल्या देशात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेऊन संक्रमणाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने २२ मार्च पासून देशभरात संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळे हातावर पोट असलेल्या, मोलमजुरी करणार््याना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच खूप जणांवर उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन ‘सख्य महिला मार्गदर्शन केंद्र निर्मळ’ ही संस्था वसई तालुक्यात कोवीड – १९ मदत कार्यात मुंबई रिस्पॉन्स नेटवर्क द्वारे समन्वयक म्हणून काम पाहत आहे, त्याआधारे दमुबाई सालू वाझ चरिटेबल ट्रस्ट, युथ फीड इंडिया मुंबई, लाईट हाऊस फाऊंडेशन,मी वसईकर आणि सिल्वर ईनींग यांच्या मदतीने नालासोपारा पूर्व येथील भीम डोंगरी,चुळणे गाव,भाबोळा,भुईगाव तसेच निर्मळ नजीकच्या आदिवासी भागात जसं की शिवशंकर पाडा,सुळेश्वर पाडा, मालई पाडा, शांतीवन पाडा, जोगेश्वरी पाडा गिरीज,गासडोंगरी,भदाणे पाडा,बंदर पाडा येथील ७८० कुटुंबासाठी धान्य वाटप करण्यात आले. या कामी वस्ती मधील युवकांनी तसेच जन आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी विशेष मदत केली, या निमित्ताने सर्वांनी संस्थेचे आभार मानले.
‘घरात रहा सुरक्षित रहा’ हे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रभावी उपाय असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे लक्षात आले की ,ज्या महिला आणि मुले आधीपासूनच घरगुती हिंसाचाराचाने तसेच लैंगिक शोषणाच्या बळी आहेत त्यांना या संचारबंदी च्या काळात शोषण करणारी व्यक्ती २४ तास घरातच असल्याने अधिक प्रमाणात हिंसाचार सहन करावा लागत आहे तसेच घरगुती हिंसाचाराच्या घटना किंवा केसेस ही वाढत आहेत हे लक्षात घेऊन सरकार दरबारी संचारबंदी च्या काळातील महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी सख्य संस्थेने इतर संस्थाशी समन्वय साधून प्रयत्न केला. तसेच आँनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सख्यने प्रतिनिधित्त्व केले आणि टेलीफोनीक समुपदेशन करत आहे .