
महाराष्ट्रात सरकारने नियंत्रण आणायलाच हवे!

पत्रकारितेला वेश्या बनवले जात आहे. हे विधान धाडसी असले तरी ते आजचे भीषण वास्तव आहे. एकीकडे राजकीय तालावर चालणाऱ्या सोशलमिडियावर अनेक प्रसारमाध्यमांनी ताल धरलेला दिसतोय तर दुसरीकडे सच्चा पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार सुरु आहे!
केवळ जगण्यासाठी शरीर विक्रय करणारी स्त्री ही वेश्याव्यवसायचा मार्ग स्वीकारते ! तसाच प्रकार
आपले चँनल्स चालावे, पेपर चालावेत,राजकारणातील दुकानं चालवीत, यासाठी कोण आटापिटा सगळीकडे होताना दिसतोय.
जिथे निवडणुका आहेत, तिथे वेगवेगळे विषय घेऊन त्याचं भावनीक राजकारण होताना दिसतय ते या काळात तर शिगेला पोहोचले आहे.
सगळ्यांचे टारगेट दिल्ली व महाराष्ट्र आणि आता बिहारसाठी महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे!
महाराष्ट्रात बाँलिवुड आहे! सर्व मिडियाचा मोठा बाजारही इथेच आहे.
बाँलिवूडमधे जसा काळापैसा आणि कोटीच्या कमाई करणारे पैसे लावणारी, श्रमिकांचे, महिला, पुरुषांचे शोषण करणारी रँकेटस आहेत तसाच मोठ्ठा पैसा असणारे आणि चौथा स्तंभ म्हणून दुकान लावून खऱ्या पत्रकारितेला गुलाम बनवणारी रँकेटसही मिडियात आहेत.
मग कठीण काळात पत्रकारांच्या कठीण परिस्थितीवर काहीजण गळे काढताना दिसतात, कुणी वैयक्तिक कैफियत मांडून कामावरून काढून टाकण्याची राजीनामा देऊन पत्रकारितेत राम नाही म्हणतो, तर अचानक होलसेल काढून टाकल्यावर त्यातलं कुणीएक आपली हतबलता आणि खूपच भावनिक पत्र वायरल करतात. यावर सगळे चुकचुकतात, फेसबुकवर, वाँटस्अपवर दुःख आणि कठीण काळाबद्दल चार ओळी लिहीतात.
या काळात अनेक पत्रकार
बेरोजगार झाले, तिथेच काम करणारे इतर पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, विविध संपादकीय पदव्या ,मोठी पॅकेज घेणारेआपला नंबर लागला नाही ना म्हणून खुशीत खुर्ची उबवतात!
कोणत्या चँनल व वर्तमानपत्रात छटाई यादी लागणार यावर मसालेदार गपचूप चर्चा गाँसिप करतात,आणि जे लक्ष्य असतात अशांना टकमक टोकाजवळ नेऊन पोहोचवतात, म्हणजे मालकांना त्यांचा कडेलोट करणं सोपं होतं!
काम जाणार ही भीती इतकी पसरवली गेलीय की सांगता सोय नाही!
आणि जर राजीनामा दिला नाही तर या पत्रकारिता विश्वात कुठेही कुणीही काम देणार नाही अशा धमक्या देणारे मालकांचे दलाल मालक, संघटना रितसर काम करत असतात, घाबरवत असतात! म्हणजे लढाईच खिळखिळी करून ठेवतात!
राजीनामा देऊन कंपनी व मालकावर आपण उपकार करतो कारण मालकांना कोर्टात आम्ही काहीच केलं नाही या सर्वांनी राजीनामे दिले हे सांगता येतं!
कामावरून काढणाऱ्या लोकांसाठी का इतर कर्मचारी पत्रकार आवाज उठवत नाहीत हा प्रश्नही सध्या हास्यास्पद होईल!
कारण यांना नारळ दिला नाही तर तो नारळ आपल्याला मिळेल हे यांना माहिती असतं!
असो तर एकूणच अनेक राज्यात देशभरात पत्रकारांवर कोरोना संकट आहे. नोकरी जातेय त्याबरोबर खोट्या केसेस दाखल करण्यात येत आहेत.
भ्रष्टपणाचा कळस गाठला जात असताना कुणी लिहिलं तर कायद्याचा नियमांचा बडगा उगारला जातोय.
देशभरात मारतोय तो कामगार, श्रमिक, पत्रकार!
रोशन डायस कशाने अकाली मरण पावला?
त्याचेबद्दल काय व का घडलं? यावर ना ते चँनल बोलत ना इतर कोणी आपलं थोबाड उचकटून बोलत!
तो मेला त्याच्या मरणाने! त्याची दोन छोटी बालबच्ची उघडी पडली! कुणाचं काय गेलं?
तो मिडियाचा एक भाग होता, का कुणी मदतीला गेलं नाही?
लकवा भरलेले हात आणि मनं कशी लिहितील, बोलतील?
चँनलच्या टिआरपीसाठी सुशांत राजपुतचं मरण चघळता येतं!
याआधी शिलान्यास झालेल्या राममंदिराचा पुन्हा शिलान्यास या कठीण काळात होतोय!
कशाचं राजकारण आणि राजकीय आखाडे का लावले जात आहेत हे जनता जनार्दनही ओळखते! यावर सर्वसामान्यांचं काय भलं होणार आहे हेही माहिती आहे.
पण यावर मसालेदार, गरमागरम चर्चा रंगत आहेत!
महाराष्ट्र लक्ष्य आहे, पत्रकार गटात नव्हे गँगमध्ये वाटले गेलेत!
सुपारी, पॅकेज, पाकिटावर चावी दिलेली बाहुली नाचत आहेत!
फार वाईट आहे हे! एका कडेलोटाकडे ही अधोगती सुरु आहे!
सुशांत राजपूत प्रकरणात राजकीय मसाले मारणे, थेट बिहारहून पोलीस अधिकारी येणे, मग ते क्वारंनटाईन होणे त्यावर राजकीय वादंग उठवणे, बिहारमधून युद्ध पातळीवर एफआयआर झाली म्हणून ते झटपट उठूनमहाराष्ट्रात येऊन चौकशी करु शकतात का? महाराष्ट्रात सुशांतच्या वडिलांच्या फेब्रुवारीत दिलेल्या तक्रारीवर संबंधित पोलीसांनी का दखल घेतली नाही? यावर महाराष्ट्र पोलीसांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहेच.
पण एकदम महाराष्ट्रात असुरक्षित वातावरण आहे असे गळे काढण्यात काही पाँईंट नाही!
याहीपेक्षा गंभीर विषय आहे तो सच्चे पत्रकार व पत्रकारिता सक्षमपणे कार्यरत रहाण्याची!
महाराष्ट्रात, मुंबई त अनेक वर्तमानपत्रे व चँनल्सनी दुकानं लावलीत, मात्र अचानकपणे आपल्या आवृत्या ,पेपर कार्यालये बंद करताना ही मंडळी महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विभागाला कळविण्याची गरजही समजत नाहीत.म्हणजे सरकारला ते जुमानत नाहीत की त्यांचे साटेलोटे असते?
आपलं कामं संपलय,सध्याची गरज संपली म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना न सांगता सगळी संपर्क साधने,काम बंद करून तुमची सेवा आम्हाला नको कंपनी नुकसानीत आहे असं जीवघेणं पत्र पाठवून ही लोकं पळून जातात!
या महाराष्ट्रात काम करणाऱ्या आपल्या क्षेत्रातील सहका-याबद्दल *नेशन वान्टस टू नो* ला गळा फाडावासा वाटत नाही,जो माणूस आपल्यावरच्या वैयक्तिक खटल्याला(एका इंटीरियर डिझाईनर च्या मृत्यू)लाही राजकीय रंग देऊ पहातो तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख मुंबईतल्या कार्यालयातून करतो,तरीही सरकार गप्प!
पत्रकार आपल्याच कंपनीतल्या अन्यायाविरोधात ठाम उभे रहात नाहीत.
केवळ आपली जागा संगीतखुर्चीतल्या खुर्ची प्रमाणे कायम रहावी म्हणून यांची धडपड सुरु आहे!
ही अशी पत्रकारिता काय कामाची? जी आपले सन्मानासाठी पत्रकारितेच्या भल्यासाठी सच्चाईसाठी आवाज उठवू शकत नसेल?
सरकारलाही पत्रकारांच्या या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पहावेसे वाटत नाही ,कारण शायनिंग पत्रकारांच्या पलीकडेही पत्रकारांचे जग आहे, जे केवळ पत्रकारितेवर जगतात त्यांची अवस्था वाईट आहे, यासाठी आपण आपल्या राज्यातले नियम, कायदे वापरून काही दुरुस्ती करू शकतो हे सरकारला न वाटणं हे प्रचंड असंवेदनशीलतेचे लक्षण आहे!
महाराष्ट्राबाहेरचे चँनल्स,वर्तमानपत्र आपल्या राज्यात काम सुरु करतात त्यांना काही कायदेकानून आहेत न?
मग यावर त्या विभागाद्वारे का नियंत्रण होत नाही, *राजस्थान पत्रिका* सारखा मोठा पेपर गाशा गुंडाळून सुमडीत कसा इथून निघून जातो? का मनमानी पद्धतीने एक्सप्रेस, सकाळ, लोकमत,डिबिकाँर्प,अंबिका प्रिन्टर्स,टाईम्स आदी मोठे ते इतरही मध्यम आस्थापनांकडून काम होत आहे?
कोणाचं काम आहे यावर नियंत्रण ठेवण्याचं?
महाराष्ट्रात कधीही या कमवा ,इथलेच आहात तर लाड करून डोक्यावर बसवा, असले प्रकार आता तरी थांबायला हवेत!
कामगार, श्रमिक पत्रकार जगला तर तुमचा लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकेल! अन्यथा चौथ्या स्तंभाच्या नावाखाली वेश्याव्यवसायच सुरु राहिल!
सुशांत राजपूतचा मृत्यु व त्यामागे षडयंत्र असेल तर दोषींना शिक्षा होणे आवश्यक पण महाराष्ट्र विरूध्द बिहार हा रंग कशासाठी?
आजवर महाराष्ट्राने सर्वांना भरभरून दिलय, अनेकांची कर्मभूमी आहे ही!
आता या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रावर चिखलफेक का होतेय याचे वास्तविक भान व जाण सत्ताधारी व विरोधकांनाही असायला हवेच!
राजकारणापेक्षा आवश्यक आहे ते एकमेकांचा सन्मान राखणे !हीच आपली संस्कृती आहे!
पत्रकार व पत्रकारिता टकमक टोकावर उभी आहे यावर का सगळ्यांची तोंडं उचकटत नाहीत, का कुणी आपल्या सहका-यांबद्दल संवेदनशील नाही?
एनयुजे इंडिया ने दिल्लीत आवाज उठवला महाराष्ट्रात एनयुजे महाराष्ट्र मदत करतोय!
पण हे पुरेसं नाही!
प्रत्येकाने आपल्यावर संकट येण्याआधी तयारीने काम करायला हवे.
कोरोनापेक्षाही मोठे वायरस राजकारणात आणि आपल्या पत्रकारितेत आहेत. जे सदैव मास्क लावून वावरतात! कारण यांचे खरे चेहरे कुणी पाहू शकणार नाही इतके ते विद्रूप आहेत!
इतरांना संपवण्याचा खुनशी भाव यांच्या डोक्यात व डोळ्यात सतत असतो! यांचेवर अचूक औषध फवारणीची गरज आहे!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेकडून आमची एकच अपेक्षा या कठीण काळात कायदा व नियमानुसार काम व्हावं! आम्हाला सन्मानाने जगता यावं म्हणून वेळ जाण्याआधी कृती करा!
कुणीही यावं टिकली मारून जावं अशी जी अवस्था प्रसारमाध्यमांची आहे ती बदलायला हवी!
अत्यंत अभ्यासपूर्ण सर्वहितकारी ठोस पावले उचलण्याची गरज आणि हीच ती वेळ आहे!
चौथ्या स्तंभावर होणारी ही अतिक्रमणं थांबायला हवी.
सच्चा पत्रकार व पत्रकारिता जगायला हवी!
कटनी छटनी आणि मनमानी दुकानदारी बंद व्हायलाच हवी!
जर वेळीच चाप लावला नाहीत तर कोणाचच काही खरं नाही