
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा वसई तालुका अंतर्गत सत्पाळा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी के. के. पिंपळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत माजी सरपंच व माजी उप सभापती पंचायत समिती वसई जयप्रकाश ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना पत्र दिले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सत्पाळा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी के. के. पिंपळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सत्पाळा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच व माजी उप सभापती पंचायत समिती वसई जयप्रकाश ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना दिलेल्या पत्रात खालील प्रमाणे आरोप केले आहेत. दि. १३.८.२०२० रोजी जयप्रकाश ठाकूर यांनी पत्र दिले होते. अद्याप पर्यंत सदर प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. ग्राम पंचायतीमध्ये बेकायदेशीरपणे महिला शिपाई भरती, तलाव लिलावात गैर कारभार, हगणदारीमुक्त गाव कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात आलेले शौचालय तोडण्यात आले. यामुळे गैरसोय होत असून याबाबत ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता काही कारवाई नाही. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैर वापर करून मनमानी पद्धतीने ६ लाखाहून अधिकचा खर्च केला आहे. सत्पाळा व कळंब ग्राम पंचायतींचा कारभार पाहणाऱ्या के. के. पिंपळे यांच्या मनमानी कारभारामुळे येथील जनता त्रस्त आहे.
ग्राम विकास अधिकारी के. के. पिंपळे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आलेले असून सदरबाबत सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी.