नालासोपारा:- वसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत विविध प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह सदस्यांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल ठाकूर ह्यांनी ह्या प्रकरणाची तक्रार करुन सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य हे अपात्र ठरले आहेत. अतिरिक्त विभागीय कोकण आयुक्तांनी दिलेल्या ह्या निर्णयामुळे वसई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सरपंच संगिता मेघराज भंडार, उपसरपंच उमेश सदानंद पाटील, सदस्य कविता उमेश पाटील, गीता ज्ञानेश्वर ठाकुर, राहुल सुधाकर किणी, मनोज भरत वरठा हे सर्व अपात्र ठरलेले आहेत. या सर्वांनी विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४(१) ह नुसार त्यांना सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी माजी सरपंच अनिल ठाकुर यांनी अतिरिक्त विभागीय कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना अपिलार्थी यांचा दावा ग्राह्य धरला. त्यांनी मालमत्ता कर थकवल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य राहू शकत नाही असा आदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *