

वार्ताहर-आकेश मोहिते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा गजबजा कायम टिकला असून संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंना लवकरात लवकर बाधा घालण्यासाठी भारत सरकार अर्थात राज्यसरकार ही अगदी झटपट सकारात्मक निर्णय देत असताना दिसत आहेत. डॉक्टर्स, नर्स, सरकारी कर्मचारी, इत्यादींचे मोलाचे सहकार्य सार्थक लागण्यावर संपूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. असे प्रयत्न चालू असताना सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा चौथा बळी झाल्याचे निदर्शनास आले असून त्या व्यक्तीचे वय वर्ष ६५ होते या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात भरती झाल्या नंतर अतोनात प्रयत्न करूनही त्यास मृत्यूला सामोरे जावे लागले काल संध्याकाळपासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असतानाचे दिसले देशभरात कोरोना विषाणू लागण झालेल्या माणसांची संख्या ५०० पर्यंत पोचली असून महाराष्ट्रातील हा आत्तापर्यंतचा नववा रुग्ण मृत्युमुखी पडला आहे अशा परिस्थिती वर आळा घालण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असताना आपण आपली काळजी कशी घेतो यावर लक्ष नियंत्रित करून आपणास दिलेल्या नियमानुसार त्यांची अंमलबजावणी केली तर नक्कीच कोरोनाचे थैमान कुठेतरी आवाक्यात येण्यास मदत होईल. म्हणून सरकारने दिलेले नियम सर्व प्रथम पाळा, काळजी घ्या. तुमच्या या कृतीने आपण नक्कीच या महामारीवर विजय अर्पण करण्यास मदत करू.