

वसई : भाजपा वसई रोड मंडळाकडून सनसिटी येथे कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या “निम्बार्क” या आयुर्वेदिक औषधाचे वाटप खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थित करण्यात आले. मागील 10 दिवसांपासून वसई तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय अथक मेहनत करत वसई-विरार येथील लाखो कामगारांना पोचवण्यात वसईचे प्रांतअधिकारी स्वप्नील तांगडे व तहसीलदार किरण सुरवसे यांची संपूर्ण टीम हे काम करत आहे. आज पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सनसिटी मैदानची पहाणी केली व आढावा घेतला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार व “केरळ आर्यवैद्य” या आयुर्वेदिक औषध कंपनीचे संचालक अमरदास नायर यांनी काळीज पोटी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थित कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या “निम्बार्क” या आयुर्वेदिक औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी वर्गाने भाजपा वसई रोड मंडळाचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे संजय सिंग, रामानुजम, जितू पाटील, मनोज चोटलीय आदी पदाधिकारी उपस्थित होते.