

विरार (प्रतिनिधी) : विरार, नालासोपारा, वसई येथील मराठी तरुणांच्या कोविड-19 काळात नोकर्या सुटल्या असतील अथवा त्यांना कामावरून कमी करण्यात आले असेल, त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल अशा स्थानिक मराठी मुलांना समर्पित सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथम प्राधान्य देऊन रोजगार देण्यात येणार आहे.
रोजगाराचे स्वरूप – स्वत: चाकी (कार), तीन चाकी (रिक्षा) वाहन घेऊन चालवायचे असल्यास प्रशिक्षण आणि वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) अत्यंत माफक शुल्कात करून दिले जाईल. तसेच इतर व्यवसायाकरिता मार्गदर्शन आणि मदत केली जाईल.
शिक्षण : अट नाही, वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण असावी आणि व्यावसायिक परवाना(लायसन्स) करिता 20 वर्ष पूर्ण असावी. लागणारी कागदपत्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड, विजेचे देयक, शिधा पत्रिका, विमा प्रमाणपत्र, 3 फोटो.
टिप -वरील कागद पत्र महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हातील असली तरी चालतील. इच्छुकांनी स्वतःची माहिती व्हाट्सअप क्रमांक- 8097747365 या क्रमांकावरती संपूर्ण माहिती, नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण, कोणता रोजगार अथवा कोणते वाहन चालविण्यास इच्छुक आहात ते कळविणे, अधिक माहिती करिता संपर्क-महेश अंबाजी कदम 9881337931, 9823490062, संपर्क करण्याची वेळ- सकाळी-9 ते सायंकाळी-7 वाजे पर्यंत. संपर्क कार्यालय, रिदम एन्टरप्राजेस, एन /11, हिल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था, जीवदानी रोड, विरार (पूर्व), ता.वसई, जि-पालघर -401305, मुदत – 14 जून ते 13 जुलै 2020.वसई, जि-पालघर -401305, मुदत – 14 जून ते 13 जुलै 2020