*

रत्नागिरी(विशाल मोरे)-पैसे खूप जणांकडे असतात मात्र दानशूर वृत्ती सर्वांकडे दिसत नाही. खेड तालुक्यातील असगणी गावचे सुपुत्र , खेड तालुका मनसे उपाध्यक्ष श्री संदिप फडकले हे 22 वर्षे दुबई मध्ये नोकरी करून आपल्या जन्म भूमित परतले. जन्म भूमीत आले आणि त्यांनी खेड तालुक्यातील अनेक शाळा डिजिटल केल्या, अनेक विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप केले. आजही अनेक सामाजिक कामे संदिप फडकले करत आहेत. असगणी गावात एस टी सुद्धा चालु केली. असगणी गावात प्राचीन पांडव कालीन मंदिर होते त्या मंदिराचे काम स्वतः संदिप फडकले यांनी केले आहे. त्यांची एकच भावना आहे जो इतिहास आहे तो लोकांना समजला पाहिजे. अनेक गावात पाणी प्रश्न भेडसावत आहे संदिप फडकले तिथे जाऊन पाहणी करत असतात आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी सतत संदिप फडकले प्रयत्नशील असतात. त्यांनी यापूर्वी पण काही मुले दत्तक घेतली आहेत. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी श्री संदीप फडकले यांच्या माध्यमातून काडवली हुमणे वाडी, कांगणे वाडी या गावातील ३ कुणबी समाजाच्या मुलांना कुमारी. साक्षी गणेश फागे, रवींद्र गणेश फागे, सिद्धी बेचावडे यांना दत्तक घेतले त्यांच्या सर्व संगोपनाचा खर्च श्री. संदिप फडकले साहेब करणार आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र पंचक्रोशीत कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *