
समाजसेवाच हीच ईश्वरसेवा
कल्पनेचे उगमस्थान व केवळ समाजसेवाच अशी ओळख असणारे; नायगाव पुर्वचे श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट आणि या ट्रस्टचे जबाबदार अध्यक्ष मा. धरेंद्र कुलकर्णीजी यांच्यशी या नात्या कारणांनी सतत संपर्क येत असतोच. आज ही अशाच सामाजीक बांधीलकीची जाण ठेवुन जी जबाबदारी घेतलीय त्याचा जवळुन अनुभव आला; आणि नकळत माझा हात लिखान करायला भाग पडला.
साधारण पाच वर्षापुर्वी या पवित्र कामाची नाळ बांधली होती; यात गरिब विधवा महिलांच्या चार पाल्यांच्या शिक्षणाची इयत्ता बारावी प्रर्यंतची जबाबदारी घेतली.
या महत्वाच्या कामाचा उल्लेख ही न करता केवळ समाज कार्य हे ट्रस्ट व याचे अध्यक्ष आणि त्यांचा जवळचा मित्र परिवार करत आहेत.
ते जरी जाणीव पुर्वक शांततेत कार्य करत असले तरी त्यांची नाव नमुद करायचा मोह मला आवरला नाही म्हणुन आवर्जुन उल्लेख करावा वाटतो अति शांतप्रिय व सामाजसेवेत अग्रगण्य असलेले बापाणे नायगाव पुर्वचे “मा. विलास भोईरजी ” यांचे व तसेच नायगाव पुर्वचे समाजसेवा दक्ष व समाजसेवेस प्रसिध्दी न घेता मदत करणारे मा. सचिन म्हात्रेजी यांनी प्रत्येकी एकाचे शैक्षणीक पालकत्व इयत्ता बारावी पर्यंत व श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टनी दोन मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. या मुलां/मुलींना आज स्कुल बॅग , वह्या काही शैक्षणीक साहीत्य व वर्षभाराच्या शालेय फि चा चेक देण्यात आला .
सर्व सेवाभावी मान्यवर मा. विलास भोईरजी , मा. सचिन म्हात्रेजी आणि ट्रस्ट चे अध्यक्ष मा. धरेंद्र कुलकर्णीजीं चें शब्द सुमनानी आभार मानतो. या प्रसंगी ट्रस्टची टिम एकजुटीने कार्यरत होती त्यांचे सर्वांचे खुप कौतुक . या उपक्रमाचे साक्षीदीर होणाचा योग मला दिल्या बद्दल मी समाजसेवीका स्नेहा जावळे आपली आभारी आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .
