नालासोपारा पूर्वेला फ्लायओव्हर ब्रिज खाली भाजी विकणाऱ्या एका वयोवृद्ध आईने आपल्या तरुण मुलीची हकीकत सांगितली कि साहेब माझी मुलगी किरण सोलंकी वय 28 वर्ष ही भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते तिला 3 वर्षाचे छोटे बाळ असून ती सतत हृदयाला होल असल्याने अंथरुणाला खिळुन पडलेली असते.तिची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ती योग्य ती शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करू शकत नाही. तेव्हा कृपया तुम्ही तुमच्या मनसेच्या माध्यमातुन काही तरी मदत करा अशी विंनती केली असता.तिला मी माझ्या चांगल्या सहकारी आणि संस्कार सेवा संस्था तथा कल्याणी जैन सेवा भावी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.पिंकी नरेश पाटील यांच्याकडे ताबडतोब जाण्याचा सल्ला दिला.त्या प्रमाणे त्यांनी त्या समाजसेविकेची भेट घेतली. डॉक्टरांनी पीडित रुग्णाची ताबडतोब लाईफ लाईन हॉस्पिटल मीरा भाईंदर मुंबई येथे सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या.पेशन्टची हालत अंत्यत नाजूक असल्याचे पाहून ताबडतोब ऍडमिट करून घेण्यात आले.2 दिवसात त्या महिलेवर यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया पार पडली. सदर महिला ठणठणीत होऊन आपल्या पती व बाळा जवळ सुखरुप घरी पोहचली.ती आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखातून बाहेर पडल्याची आनंदाची बातमी कानावर पडली. खरंच खूप बरं वाटलं.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नालासोपारा शहरसचिव या नात्याने एका बहिणीचा जीव वाचवला याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यात मला मोलाची साथ देणाऱ्या सौ. पिंकी पाटील यांचे मनःपूर्वक धन्यवाद.. तसेच या पुढे देखील कुणाला कोणतीही आरोग्य विषयक मदत हवी असल्यास मला संपर्क करा……. आपला… श्री. राज नागरे ( सचिव) महाराष्ट्र नवनिर्माण सेना नालासोपारा शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *