(वसई दि. ६ एप्रिल २०२० )लोकडाऊनच्या कठिण काळात एकीकडे सारा देश लढत असताना दुसरीकडे मजूरवर्गाचे खास करून हातावर पोट असणार्‍या तळागाळातील जनतेचे हाल होत आहेत.
अश्यावेळेस कामण येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते तसेच सा. समाज मन चे संपादक श्री. मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी आपल्या नातवंडांना सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली.
श्री. मनोहर गुप्ता यांनी त्यांचे नातू पार्थ , वय १० वर्ष, बेबो , वय ८ आणि शौर्य वय ४ वर्षे यांना सोबत घेवून गावराई पाडा येथील गरिब मजूर कुटूंबियांना धान्य वाटप केले.
अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने आलेल्या लोकांना सेनिटायझर ने हात धुवायला लावून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तद्नंतर ७५ कुटूंबियांना धान्यवाटप पार्थ, बेबो आणि शौर्य यांच्या हस्ते करताना या तिन्ही मुलांना सामाजिक बांधिलकीचे बाळकडू श्री. मनोहर गुप्ता यांनी दिले.
सदर प्रसंगी रवी घरत, धुमाळ , सौ. पुर्वा साळवी व अतुल साळवी यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर प्रसंगी या ७५ कुटूंबियांनी साप्ताहिक समाज मन टिम चे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *