
नालासोपारा (प्रज्योत मोरे) – दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता क्राईम रिपोर्टर यांच्या आंबावडी येथे कार्यालयात पालघर जिल्हातील पदाधिकारी यांची बैठक ठेवण्यात आले होते या बैठकीत पी.एम दुपारे यांनी पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने येणारे प्रश्न उपस्थित केले तसेच संघटनेच्या वरिष्ठांची काही तांत्रिक अडचणी त्याने मांडले व ते न पटण्या सारखे होते त्यामुळे त्यांनी आज या बैठकीत सर्व प्रथम स्वतःचा राजीनामा दिला. त्यांचे राजीनामा बघताच सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक पद्धतीने सर्व पदाधिकारी यांनी राजीनामे दिले. या प्रसंगी दुपारे यांनी पदाधिकाऱ्याना संबोधन करून सांगितले तुम्हीच माझी ताकत आहे तुमच्या शिवाय मी शून्य आहे तुम्ही माझे बळ आहेत मी एकटा काही करू शकत नाही आपण नेहमी मला साथ देतात. तसेच महिला आघाडीचे गडा मॅम यांनी आपल्या भाषणात सांगितले आम्ही आपल्या सोबत आहेत आपण जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, दुपारे यांना कार्यकत्यांनी विनंती केली आपण स्वतःची संघटना तयार करा आम्ही आपल्या सोबत आहे असे बोलुन सर्वांनी पोलीस बॉईज असोसिएशन चे ओळखपत्र पी.एम.दुपारे कडे जमा केले लवकरात लवकर नवीन संघटनांची घोषणा करणार आहे असे प्रज्योत मोरे यांनी कार्यक्रमच्या सांगता वेळी सांगितले तसेच कार्यक्रमाच्या सूत्र संचालन तेजस दुपारे यानी केले कार्यक्रम मध्ये पालघर जिल्हा कमिटी तालुका कमिटी शहर कमिटी आणि वार्ड कमिटी महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.