सत्पाळा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

माजी सरपंच अनिल ठाकुर ह्यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतीनीधी वसई
वसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत हि नेहमिच विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली आहे.
आता पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार चालवणारे यांनीच मालमत्ता कर भरलेला नसल्याचे प्रकार माजी सरपंच अनिल ठाकुर यांनी समोर आणला आहे.
ह्या संदर्भात माजी सरपंच अनिल ठाकुर यांनी ह्या संदर्भात दिनांक २३/१२/२०२२ रोजी अर्ज दाखल केला होता. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ (१) मधील तरतुदी नुसार आणि मुंबई ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० मधील नियम ८ नुसार मालमत्ता करी विहित मुदतीत भरणा केला नसल्याने त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ – (१) (ह) प्रमाणे अनर्ह करणे कामा विनंती केली होती. ह्या प्रकरणी येत्या १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर येथे सुनावणी लावण्यात आली आहे.
तसेच वेळेवर कागदपत्रासह उपस्थित राहुन आपले म्हणणे सादर न केल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्ह्याधीकारी पालघर ह्यांच्या कार्यालयातुन पत्रा मार्फत करण्यात आले आहेत.
ह्या संदर्भात नेमकी काय निर्णय होतो ह्याकढे सर्वांचेच लक्ष वेधून आहे. विद्यमान सरपंच उपसरपंच सह चारही सदस्य अपात्र होतील असा विश्वास माजी सरपंच अनिल ठाकुर यांनी व्यक्त केल्याने मध्यावधी निवडणुकिसाठी विविध पक्षाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *