

दिनांक12 सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र शासनाचे आदेश अनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अंतर्गत असणारी सर्वे क्रमांक 176/177 गाव मौजे दिवान तालुका वसई जिल्हा पालघर येथे सीआरझेड व पाणथळ दोघांसाठी ना हरकत दाखला देण्यात आलेला आहे व सदरची जागा ही अल्पसंख्यांक साठी सर्वधर्म दफनभूमी म्हणून आरक्षित होती. 1998 पासून वसई एच वर्ड मध्ये राहणारे अल्पसंख्यांक बांधवांना शहरातल्या भूमाफियांचा खूप त्रास सहन अल्पसंख्यांक समाजाला करावा लागाला. अब्दुल गफार साहेब हे मागील काही वर्षापासून सदरचे जागेवर दफनभूमी मिळावी म्हणून खूप मेहनत करत होते, 2012 ला त्यांचे निधन झाल्यानंतर महानगरपालिका ही जमीन भुमाफियाला विकण्यासाठी सक्रिय झाली होती. एमसी झेड एम ए याची परवानगी न काढता सदरचे जागेचा झोन सर्टिफिकेट न बघता महानगरपालिकेने चार कोटी चा टेंडर काढून अल्पसंख्यांक बांधवांची दिशाभूल केली. अल्पसंख्यांक बांधवांचे याद विषय दिशाभूल करण्यचा फायदा स्थानिक राजकीय पक्षांना खूप लाभला, व सदर चे जागेवर अनधिकृत रीतीने महानगरपालिकेने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केलं. अल्पसंख्याक बांधवांचे मत विकत घेण्यासाठी महानगरपालिकेची व सक्रिय स्थानिक राजनीतिक पक्षाची मैत्री स्पष्टपणे दिसून आली. सदरचे दफनभूमी चे विरोधात प्रकाश लोढाया व सूनील मुळे हे खूप सक्रिय होते व त्यांनी काही लोकांना एकत्र घेऊन सन सिटी वेलफेअर असोसिएशन च्या माध्यमाने मा. हरित लवादकडे दावा दाखल करून भूमाफियांना मदत करून अल्पसंख्यांक वर अत्याचार केला. ह्या दाव्यासाठी माझी उपमहापौर उमेश नाईक यांच्या शब्दानं मुळे खूप मोठी हार अल्पसंख्य ना सहन करावी लागली. या नंतर CRZ, MCZMA, व WETLAND असे फार मोठे डोंगर महानगरपालिकेने अल्पसंख्याकांसाठी निर्माण करून तयार ठेवले. सदरचे जागेवर. CRZ चा ना हरकत दाखला प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने पानथळ असा प्रश्न निर्माण करून अल्पसंख्यांक ची फसवणूक केली. पण ज्याच्या जोडीला देव त्याला कोण हरवेल अशी बाब माननीय श्री कैलास पाटील आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी अल्पसंख्याकांसाठी सांगितले. के जी एन सोशल वेल्फेअर असोसिएशनचे कल्लान खान व जहीर शेख, यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश प्राप्त होत नव्हता म्हणून कैलास पाटील यांना जावेद अन्सारी भाजप चे अल्पसंख्यांक नेते यांनी पुढाकार दिली काकांनी व त्यांचे सहकारइंचे संघर्ष मुळे 21 वर्षापासून अडकलेला सर्वधर्म दफनभूमी चा हा मुद्दा आज सुटलेला आहे. सदरच्या जागेवर आता कोणत्याही प्रकाराचा खोळंबा महानगरपालिका घालू शकत नाही व महानगरपालिका हे अल्पसंख्यांकांच्या ताकती समोर व आगरी सेनेच्या एकते समोर तडफडत दिसू शकते. कल्याण खान यांच्या भाषणांमध्ये त्यांनी स्पष्ट केला जर अल्पसंख्यांक एकत्रित राहिली तर शासन असो प्रशासन असो की महानगरपालिका असो त्यांना मात देता येऊ शकते व या ठिकाणी जहीर शेख यांनी संविधानाने जग जिंकु शकतो अशी भूमिका मांडली. जो पर्यंत जावेद अन्सारी याच्या संघर्ष मध्ये काकां सोबत आहेत त्यावर महानगरपालिकेतर्फे जेवढी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करू शकली असती त्यांनी केले पण तरीसुद्धा अल्पसंख्याक समाजाचा निष्कर्ष हा महाराष्ट्र शासनातर्फे वाटेला लागला व आगरी सेनेचे श्री कैलाश पाटील यांनी दिलेल्या आश्वासन अनुसार ते खंबीरपणे दफनभूमी साठी उभे राहिले व जो मुद्दा 21 वर्षापासून टाळाटाळ करण्यात येत होता तो मुद्दा त्यांनी नऊ महिन्यांमध्ये पार पडला. आगरी सेना अल्पसंख्यांक समाज कोळी समाज सगळे पालघरमध्ये एकत्रित दिसून येत आहेत, बाबांचा आश्रम असो की सर्व धर्म दफनभूमी असतो सगळे ठिकाणी आगरी सेनेचा झेंडा फडकवत कैलास पाटील चे नेतृत्वाखाली समाज व समाज चे ज्येष्ठ नेते स्वतःला संरक्षित व सक्षम बघत आहेत. माननीय श्री कैलास पाटील यांचा मत स्पष्ट होता दफनभूमी असो की समशानभूमी जन्मस्थळ असो की देवस्थळ आगरी सेना सर्वांसाठी खंबीरपणे निस्वार्थपणे उभी आहे. अल्पसंख्याकांची व आगरी सेनेचा गटबंधन बघून पालघरचा राजकारण पूर्णपणे कोसळलेला दिसत आहे. येणारे विधानसभा निवडणूक मध्ये जर आगरी सेनेनी जर आपला उमिदवर सर्व ठिकाणी घोषित केला तर बहुमातने नक्कीच निवडून येणार हे स्पष्ट दिसत आहे, कोण म्हणतो देणार नाहीं, घेतल्या शिवाय राहणार नाही.
Help prawasi majdur