
शनिवार दिनांक 10 जुलै रोजी वाघोली नाका येथे गरीब, वंचित, शोषित, आदिवासी समाजाच्या हितासाठी आयुष्यभर लढणारे *फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फादर स्टेन स्वामी यांनी जंगल तोडून, आदिवासीना उद्धवस्त करणाऱ्या खाणप्रकल्प विरोधात आदिवासींना जागृत करून त्यांनी लढा दिला.
फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली वाहताना विविध धर्मीय मान्यवरांनी फदारांच्या कार्याचा उहापोह केला.
मानवसेवा करीत असताना अन्याय विरोधात आदिवासी जनतेला त्यांच्या हक्काबाबत जागृत करीत असल्याने मोठ्या भांडवलदाराणा फादर स्टेन स्वामी यांची अडचण जाणवू लागली. केंद्र सरकारने याचा राग मनात ठेवून *भीमा कोरेगाव प्रकरणात काहीही संबंध नसताना खोट्या केसेसमध्ये त्यानां अटक करून जेलमध्ये टाकले तेही त्यांना मज्जातंतू निगडित”कंपवाद” (पार्कीन्सन) आजार असताना* मागील 2 वर्षात त्यांच्यावर आरोप करताना एकही पुरावा राष्टीय तपास यंत्रणा सादर करू शकली नाही. याबाबत सभेने नाराजगी व्यक्त केली. मानवसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या, गरिबांना दोन वेळेचं अन्न मिळावे यासाठी लढणाऱ्या फादरांना या अवस्थेत एक पेला पिण्याचा पाण्यासाठी जेलमध्ये तडफावे लागले, पण निर्दयी केंद्रातील सरकारला व न्याय व्यवस्थेला दया आली नाही. ऋषितुल्य अश्या फदारांचा एक प्रकारे या व्यवस्थेने खून केला.
त्यामुळे UAPA कायदा रद्द कारण्याबाबत शासनाने पुनर्विचार करावा असे आवाहन सभेत करण्यात आले.
सर्व धर्मीय संविधान बचाव समिती, वसई तर्फे मॅकेन्झी डाबरे , मुंबई विद्यापीठाचे माजी उपसचिव डॉ दिनेश कांबळे, माजी सैनिक अब्बास फौजी, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, फादर फ्लोरेन्स फर्नांडिस आणि फादर रेमंड रुमाव या विविध धर्मीय मान्यवरांनी शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजली सभेसाठी संपूर्ण वसईतील अनेक सर्वधर्मीय मान्यवर उपस्थित होते.
या श्रद्धांजली सभेचे नियोजन व सूत्रसंचालन समीर सुभाष वर्तक यांनी केले तर रॉबर्ट परेरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फादर स्टेन स्वामींच्या श्रद्धांजली सभेच्या आयोजनासाठी सर्वधर्मीय संविधान समिती, वसई तर्फे मौलाना सुबहान खान, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, फारूक मुल्ला, शशी सोनवणे, अभिजित घाग, दर्शन राऊत, जोएल डाबरे, विक्रात चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.
