निवडणूकिला पुर्णविराम मिळताच अनधिकृत बांधकामे जोर धरू लागली आहेत.

लाचार सहआयुक्त महेश पाटील मिठाची लाज राखण्यासाठी वरिष्ट्यांच्या आदेशालाही जुमानत नाही आहेत! एवढी इमानदारी एका कुत्र्यातचं असू शकते.

सहआयुक्त महेश पाटील म्हणतात ‘ मी इमानदारीने काम करेन पण, फक्त बांधकाम व्यावसायिकासाठी

नुकतीच शहरात निवडणूक संपली असून पुन्हा वसई विरार शहरातील अधिकारी वर्ग पालिकेत हजर असेल अशी अपेक्षा आहे.निवडणूकीचे बहाणे साधून अनेक अनधिकृत बांधकामाचे विषय दुर्लक्षित करण्यात आले आहेत.शिवाय निवडणूक झाल्यावर कारवाई होईल अशी थाप ही अधिकारी वर्गाकडून मारण्यात आली परंतु सध्यस्थीती ध्यानात घेता पुन्हा शहरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराच्या मुळावर अनधिकृत बांधकामे जशाच तशी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता फक्त स्वतःचा मनमानी कारभार करत असल्याबद्दल महापालिका वर्तुळात चर्चा आहे.महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पाऊसा आधी नालेसफाई ची कामे हाती घेतली असलीतरी अजूनही काहि ठिकाणी नालेसफाई बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांना सक्त ताकीद देऊन सम्पूर्ण नालेसफाई करण्यास भाग पाडावे. उद्या पूरस्थिती निर्माण झाली असता बशीचा आकार बोलून अंग काडून घेणे प्रतिष्ठित आयुक्तांना शोभणार नाही.

सध्या अनधिकृत बांधकामे म्हणजे अधिकारी वर्गाचे बांधकाम व्यवसायिकांशी असलेले आर्थिक संबंध असं उघड झालेले आहे.प्रभाग सी अंतर्गत पलशाचा याठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल नियमित तक्रार अर्ज दाखल करून सुद्धा तेथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सहआयुक्त महेश पाटील टाळाटाळ करत आहेत.त्यासोबत कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर आपलाकडे विषय नाही बोलून महेश पाटलांकडे बोट दाखवत आहेत.तसेच वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देऊन सुद्धा सहआयुक्त महेश पाटील कारवाई न करता त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.बांधकाम व्यावसायिका प्रति इमानदारीने सहआयुक्त महेश पाटील मिठाचा फर्ज निभावत आहे.याबाबत अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांना सांगितले असता त्यांनी संबंधीत अधिकारी वर्गाला कारवाईचे आदेश प्रस्थापित केले असल्याचे सांगितले. मग नक्की पाणी कुठे मुरतय हे लक्षात येते की,खरा भ्रष्टाचारी सहआयुक्त महेश पाटील हेचं आहेत.अश्या कनिष्ठ अधिकारी वर्गामुळे वरिष्ठांची इज्जत पणाला लावली जात आहे.अश्या भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करून वरिष्ठांनि बाकी कनिष्ठ अधिकारी वर्गाला धडा दिला पाहिजे.असे जनतेचे स्पष्ट मत असावे.

टीप:- काही दिवसांपूर्वी पलशाचा पाडा याठिकाणी सहआयुक्त महेश पाटील तोडक कारवाई करण्यास गेले असता, ज्या बांधकामाची तक्रार होती त्या बांधकामाला वगळून शेजारी असलेल्या पाच फूट बंद करून ठेवलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.त्यांना शेजारील बांधकाम दिसले नसावे कारण, महेश पाटील यांनी स्वतःच्या डोळ्यावर पैशाची झापडे बांधलेली आहेत.शिवाय सहआयुक्त महेश पाटील आणि बांधकाम व्यावसायिकामध्ये जुना याराणा आहे.असं सूत्रांकडून समजले आहे.

पुढील बातमीत- लिपिक सुनील टेलगुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अनधिकृत बांधकामाची सविस्तर माहिती उघड!
लवकरच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *