
वसई (प्रतिनिधी) चार दिवसांपूर्वी वार्ड क्रं १०३ मधील खरभाट वाडी येथे एक ४० वर्षीय महिला कोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या महिलेची तशी कोविड चाचणी ही कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल, बंगली येथे करण्यात आली होती ज्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. अशावेळी रुग्णांचा रिपोर्ट आणि त्यांची माहिती सदर महानगर पालिकेला कळविण्यात आली होती, त्यानुसार महापालिकेचे आरोग्य कर्मचारी हे सदर महिलेस कोविड सेंटर मध्ये उपचार करण्यास घेऊन जायला आले. परंतु नियमानुसार कोविड रुग्ण उपचारासाठी घेऊन गेल्या नंतर ते जिथे वास्तव्य करीत असतात तेथील परिसर निर्जंतुक करून सिल करण्यात येतो.. असे असताना सुद्धा महानगर पालिकेने कोणतेही उपाय योजना केली नाही.. आणि त्या बाबत प्रभाग समिती आय चे प्र. सह आयुक्त श्री सुभाष जाधव व आरोग्य अधिकारी श्री विकास पाटील ह्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व आम्हाला तशी कोणतीही सूचना रुग्णालय कडून मिळाली नाही असे सांगितले.. आणि त्या बाबत कार्डिनल ग्रेशियस रुग्णालय इथे चौकशी केली असता त्यांनी तारीख आणि वेळ सकट माहिती दिली की त्यांनी त्या सदर रुग्णाची माहिती ही महानगर पालिका प्रभाग समिती आय ला कळविली होती.. आत प्रश्न असा आहे की जर महानगर पालिकेला रुग्णाची माहिती जर मिळालीच नव्हती तर मग त्यांचे कर्मचारी त्या सदर महिलेस उपचार करण्यासाठी घेऊन जायला आले कसे..?? आणि ते जर महानगर पालिकेचे कर्मचारी नव्हते तर मग कोण होते…?? रुग्णालयातून प्र.सह आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना रुग्णाची माहिती मिळून सुद्धा ते अशा प्रकारे बेफिकिरी पणे कसे वागू शकतात…?? त्यांना इतर लोकांच्या जीवाची काळजी आहे की नाही…?? ते कोणाच्या सांगण्यावरून की आपल्याच तोऱ्यात मनमानी करून असे वागत आहेत…?? ह्यासाठी एक परिवार संघटना तर्फे प्र. सह आयुक्त श्री सुभाष जाधव व आरोग्य अधिकारी श्री विकास पाटील यांच्या वर वसई पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून कडक कारवाई करावी ह्यासाठी निवेदन दिले आहे. तसेच सदर ह्या गंभीर बाबतीत आयुक्त श्री गंगाधरन डी. यांनी सुध्दा त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे..