
वसई – कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणा-या सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांना नालासोपारातील सामाजिक कार्यकर्ती पूजा कट्टी यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोरोनामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दरात विकल्या जात आहेत तर अनेक वस्तूंचा तुटवडा भासत आहे.अनेक सामान्य नागरिकांपर्यंत या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होत नाही, ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पूजा यांच्या मार्गदर्शनाखाली भूपेश पाटील, मिनाज नदाफ व राजेंद्र ढगे यांनी सदरच्या उपक्रमात सहभाग घेऊन कार्याला मौलाची साथ दिली तसेच विनीत तांदळेकर यांनी दोन कुटुंबाचे जीवनावश्यक वस्तूंची तजवीज केली होती व उपक्रमास हातभार लावत शुभेच्छा दिल्या.
Nice work sister i am proud of you