

आदिवासी, वंचित, शोषित समाज्याच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी आपले आयुष्य देणारे ८२ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांना भीमा कोरेगाव प्रकरणाचा संबंध दाखवून अटक करण्यात आली आहे.
मानवी हक्कांसाठी लढणारे तसेच गरिबांसाठी कार्य करणारे फादर स्टेन स्वामी ज्याचं वय आज ८२ वर्ष आहे. ते पार्किन्सन व अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. ते कोणत्याही हिंसक व विघातक कृत्यात सहभागी असतील असे वाटत नाही.
त्यामुळे फादर स्टेन स्वामी यांच्या कार्याचा व वयाचा विचार करून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी यासाठी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी ६:३० ते ८ दरम्यान निर्मळ नाका ते वाघोली नाका असा “कँडल मार्च” (मुकमोर्चा) आयोजन करण्यात आलेले आहे. “कँडल मार्च” संदर्भातील रितसर पत्र मा. तहसीलदार, मा. पोलीस उपायुक्त, वसई आणि नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना देण्यात आलेले आहे. सदर पत्र देण्यासाठी समीर वर्तक, टोनी डाबरे, दत्तात्रेय धुळे, सुनील डाबरे, मेकॅन्झी डाबरे, ऍड खालिद शेख, अभिजित घाग व दर्शन राऊत हे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.
जास्तीत जास्त नागरिकांनी सदर ”कँडल मार्च” साठी उपस्थित राहावे हि विनंती.
यावेळी आपण कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून शांततापूर्ण कँडल मार्च (मुकमोर्चा)काढून सर्व नियम पाळायचे आहेत.
