
आदिवासी, वंचित, शोषित समाज्याच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी आपले आयुष्य देणारे ८२ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांना भीमा कोरेगाव प्रकरणाचा संबंध दाखवून अटक करण्यात आली आहे.
मानवी हक्कांसाठी लढणारे तसेच गरिबांसाठी कार्य करणारे फादर स्टेन स्वामी ज्याचं वय आज ८२ वर्ष आहे. ते पार्किन्सन व अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. ते कोणत्याही हिंसक व विघातक कृत्यात सहभागी असतील असे वाटत नाही.
त्यामुळे फादर स्टेन स्वामी यांच्या कार्याचा व वयाचा विचार करून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी यासाठी गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी ६:३० ते ८ दरम्यान निर्मळ नाका ते वाघोली नाका असा काढण्यात आलेल्या “कँडल मार्च” (मुकमोर्चा) मध्ये अनेक सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी “संविधान दिनाचे” औचित्य साधून दत्तात्रेय धुळे यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले. मेकॅन्झी डाबरे यांनी फादर स्टेन स्वामी यांची माहिती सादर केली. “सर्वधर्मीय संविधान बचाव समितीने” वसई तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचे वाचन वाघोलीचे माजी उपसरपंच सुनील डाबरे यांनी केले. फादर फ्लोरेन्स फर्नांडिस आणि मौलाना सुबहान खान यांनी फादर स्टेन स्वामी यांच्या सुटकेसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या उल्लेखासहित प्रार्थनेद्वारे सुटकेचे आवाहन केले. कामगार नेते भरत पेंढारी यांनी 26/11 मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यातील शाहिदांना श्रद्धांजली वाहिली. निवेदन पत्र स्वीकारण्यास मंडळ अधिकारी श्री होगाडे उपस्थित होते तसेच नालासोपारा पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आयोजक समीर वर्तक यांनी केले तसेच वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी उपस्थितांमध्ये आदिवासी एकता परिषदेचे प्रकाश जाधव आणि पदाधिकारी, जमीअत ए उलेमा हिंद चे वसई तालुका अध्यक्ष हाफिज इलियास , फादर व्हॅलेंटाईन पावकर, फादर रेमंड रुमाव, फादर बाप्टिस्ट लोपीस, फादर ज्यो आल्मेडा, निर्मला निकेतनच्या सिस्टर नॅटी लोपीस, सिस्टर फातिमा सिक्वेरा , मारिया सदन निर्मळच्या सिस्टर नीलिमा अथाइत व सहकारी सिस्टर व मुली , अनेक धर्मगुरू आणि धर्मभगिनी, प्रकाश कांबळे, महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, कुपारी संस्कृती मंडळाचे अध्यक्ष जिम रॉड्रिग्ज, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नेल्सन डिसोझा, युवाभारतचे शशी सोनावणे, प्रसिद्ध पथनाट्यकार झुराण सर व डायगो लोपीस, जागृती सेवा संस्थेचे राजेश गोन्सालविस, जॅक गोम्स व सहकारी, बसिन कॅथॉलिक बँकेचे माजी अध्यक्ष सिल्व्हेस्टर परेरा व माजी महाव्यवस्थापक सिल्व्हेस्टर लोपीस, ऍड खालिद शेख, जॉयल डाबरे, फारुक मुल्ला व सहकारी, अम्मार पटेल, आमिर देशमुख व सहकारी, अभिजित घाग, दर्शन राऊत, दर्शन वर्तक, एव्हरेस्ट डाबरे, शिवसेनेचे मनोहर नाईक, काँग्रेसचे राजेश गव्हाणकर व कुमार काकडे, विजय तुस्कानो आमिर सय्यद व सहकारी, पत्रकार विशाल राजे-महाडिक, प्रभाकर सूर्यवंशी, ऍड नोव्हेल डाबरे, ऍड रॉबर्ट डाबरे, ऍड अजय कोरिया, डेनिस डाबरे, सुनील आल्मेडा, गॉडसन रॉड्रिग्ज, राजा फोस, स्वीटसन फर्नांडिस, मिल्टन, लायनल, विशेषकरून वाघोली, निर्मळ, नवाळे, मर्देस, गास, भुईगाव, उमराळे, राजोडी, नंदाखाल, माणिकपूर, चुळणे, सांडोर, गिरीज या गावांतील नागरिकांची उपस्थिती तसेच मोठ्या संख्येने वसईतील सर्वधर्मीय नागरिकांनी शांततेच्या माध्यमातून सहभाग घेतला.