वसई(तहसीन चिंचोळकर)- संपूर्ण जगात कॉरोना वायरस ने थैमान घातले असताना आपल्या वसई तालुक्यातील गरीब भुकेले यांना धन्यवाटपपाची मदत येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
वसई येथील सन सिटी येथे आपल्या गावी जान्यासाठी जे परप्रांतीय लोक उपाशी पोटी वाट पाहत होते त्यांना नल्लसोपाऱ्यातील ब्रदर अँड सिस्टर ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते यश भोसले, पूजा कदम, प्रथमेश विचारे, राज भोसले, तानिया मायवंशी, संचिता सिंघ, हरीश शर्मा यांनी पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट व खाण्या – पिण्याच्या वस्तू देऊन मदत केली. या मजूराकडे पैसे नसताना उपाशी पोटी मरणाची पाळी आली होती. त्यामुळे त्याना त्यांच्या मूळ गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हते.
गेल्या महिन्याभरापासून आपल्या गावी परत जाण्यासाठी रेल्वेचे रिझर्व्हेशन करून आपल्या गाडीची सन सिटी येथील मजूर पाहताना ब्रदर अँड सिस्टर ग्रुपचे कारकर्त्यानी त्यांना खाण्या पिण्या च्या वस्तू देऊन मदत केली. या सामाजिक ग्रुप चे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *