” सामान्य बाई अन राजकारण “
सकाळी लोकलला दारात वैतागलेली ती
करत होती चिडाचीडी .
मधेच ओरडली म्हणाली ओ मॅडम सांगा
मले बी काय हाय ही ईडी.
म्हणाली मी घर काम करतो मुलगा माझा
कंपनीत जायचा .
कंपनी बंद केली मोदी साहेबांना आता दोन
मुलांचा त्यानी संसार कसा चालवायचा ?
वर आजु बाजुच्या बायकाही मग बोलायला
लागल्या अन झाल्या व्यक्त .
एकजण म्हणाली नवरा अपंग इतक्या महागाईत
घर चालवु की मुलांच शिक्षण करु ती अव्यक्त .
३३० चा सिलेंडर ६५० कसा परवडावा, हेच का
ते अच्चे दिन सांगा कस जगाव की मराव ?
शिक्षण तर जिव घेण झाल इतक महागड शिक्षण
दोन दोन मुलांसाठी कस परवडाव ?
भाज्याचे भाव बघा गगणाला टेकल दाळ करु म्हणल
तर ती बी १०० रु किलो वर गेली .
वयोवृद्ध महिला म्हणे माझ्या मुलीच घर शेती जनावर
सगळ पुरात वाहुन गेली तिचे डोळे पानावली .
मोदी साहेब म्हण २०२० पर्यंत सर्वांना घर देणार खर
चागल सपान हाय .
कंपनी बंद , महागाई , आर्थीकमंदी, महागड शिक्षण
तोवर आम्हाला साहेब जित ठेवणार काय .
ह्यो सरकार म्हणत आता पुढच्या पिढीला दुष्काळ
बघु देणार नाही या पिढीन पाहीला तो पाहीला .
सामान्य माणुस तर आता घर-मुल , नौकरी करणारी
बाई बोलली अच्चे दिन नारा कागदावर राहीला.

उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *