वसईत रस्त्यांची झाली चाळण, वाहनचालक खड्यांमुळे हैराण

नालासोपारा :- आठ ते दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वसईतील सर्वच शहरामधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झालेली पाहायला मिळत आहे. नालासोपारा पूर्वेकडील काही रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या खड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकाना उशीर होतो. जास्त रहदारीच्या म्हणजेच सकाळी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागतात. याकरिता साहेब या रस्त्यातून गाडी तुम्हीच चालवून दाखवा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क, विजय नगर, तुळींज रोड, संतोष भवन, धानिवबाग, वाकणपाडा, पेल्हार तर पछिमेकडे स्टेशन रोड, सिविक सेंटर आणि ओव्हर ब्रिजच्या आजुबाजूच्या विभागात जास्त खड्डे पडले आहेत. वास्तविक पाहता जो कंत्राटदार रस्ता बनवतो त्याचीच जवाबदारी खड्डे बुजवायची असली पाहिजे पण काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदार यांच्याशी साटेलोटे व् आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यांना काहीही बोलत नसल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.

बारा महिने समस्या

नालासोपारा फाटा ते संतोष भवन या परिसरातील रस्त्यांवर बाराही महिने खड्यांची समस्या पाजवीला पुजलेली आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडीने वाहन चालकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. रोजच्या वाहतूक कोंडीने याठिकाणी सर्वच हवालदिल झाले आहे.

१) धानिवबाग येथील मुख्य रस्त्यावर खड्डे

२) संतोष भवन येथील मुख्य रस्त्यावर खड्डे

नागरिक म्हणतात

१) दरवर्षी कसे काय रस्त्यांवर खड्डे पडतात. एकदाच मनपा चांगले रस्ते का नाही बनवत, रस्ते कंत्राटदाराला कडक निर्देश का नाही देतात. – विशाल गुप्ता (संतप्त नागरिक)

२) रस्त्यावर खड्डे पडल्याचा जास्त त्रास रिक्शा वाल्यांना होतो. खड्यांमुळे कधी अपघात होईल का हा प्रश्न आमच्या मनात सारखा पडलेला असतो. रिक्शा खड़यामधे आपटुन मोठे नुकसान होत असते. बनवन्यासाठी नेहमी खर्च करावा लागत आहे. – गोपाल यादव (रिक्शा चालक)

३) रस्त्यांवरील खड्डे आणि त्या खड्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचे वेगवेगळे टेंडर ही जणू दरवर्षीची परंपरा बनली आहे. या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजनांची गरज आहे. – मनीषा वाडकर (संतप्त गृहिणी)

कोट

नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील मुख्य रस्ता पीडब्लूडी यांच्या अख्यरितेत येतो. पेल्हार ब्रिजच्या खालील रस्त्याला पडलेले खड्डे हायवे अथोरिटी यांच्याकडे येतो. पण महानगरपालिकेच्या हद्दीमधील खड्डे लवकरच बुजवणार आहे. पावसाचा जोर कमी झाला की खड्डे बुजवण्याचे निर्देश इंजिनियरला दिलेले आहे. – राजेंद्र लाड (कार्यकारी अभियंता, वसई विरार महानगरपालिका)

खड्डे बुजवण्यासाठी मनपाने जाहीर केले प्रभाग निहाय इंजिनिअरचे संपर्क

प्रभाग ए प्रदीप पाचांगे ८८८८८६४२८१

प्रभाग बी/डी/एफ एकनाथ ठाकरे ७२१९०११११२

प्रभाग सी/ई/जी/एच/आय साटम ८८८८८६४२८७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *