

आज दि. ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ जागृती संघाच्या रमाई महिला मंडळाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ह्या जयंतीनिमित्त महिला मोठ्या उत्साही दिसल्या.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वा.बुद्ध विहारात बुद्ध वंदनेने सुरवात केली. वंदनेनंतर रमाई महिला मंडळाच्या सभासद आणि सिद्धार्थ जागृती संघाच्या माजी कार्याध्यक्ष प्रांजली काळबांडे सोबत सिद्धार्थ जागृती संघाचे अध्यक्ष आयु.अ. नि. बोदवडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संयुक्त पुष्पहार अर्पण करून जयंतीस सुरवात केली. ह्या कार्यक्रमात काही महिलांनी सावित्रीबाई फुलेंनी विशेष दिनदुबल्या महिलेबरोबर प्रत्येक धर्मातील महिलांसाठी केलेल्या भरीव कार्यावर आपापल्या भाषणातून प्रकाश टाकला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांनी विविध कार्यक्रम आयोजित करून आलेल्या सर्व नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सिद्धार्थ जागृती संघाच्या अध्यक्षांनी आलेल्या सर्व महिलांचे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याबद्दल आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.