◆ माघ अमावस्याला प्रत्येक बुद्ध लेण्यांवर दलाची मानवंदना व बौध्द कार्यक्रम होणार – भिमराव य. आंबेडकर

प्रतिनिधी : देशातील बुध्द लेण्या सरकारच्या पुरा तत्व विभागाच्या अंतर्गत असून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असताना अनेक ठिकाणी अतिक्रण झाले आहे. आता बौध्द समाज जागृत झाला असून समाजाने नियमितपणे बुध्द लेण्यावर जाऊन आपला ऐतिहासिक धरोहर टिकविणे व त्या अतिक्रमण पासून वाचावाव्यात असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलच्या मुंबई प्रदेशच्यावतीने आज माघ अमावस्या निमित्त दि.१ मार्च २०२२ रोजी कान्हेरी लेणी, नॅशनल पार्क, बोरिवली येथील आयोजीत कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा व राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल ) यांनी आवाहन केले. ते म्हणाले की भारतीय बौद्ध महासभेचे आता प्रत्येक वर्षावासाची सुरुवात बुध्द लेण्या वरून केली आहे त्याप्रमाणे समाजानेही त्यामध्ये मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला पाहिजे . भिमराव आंबेडकर यांनी पुढे सुप्पारक स्तूप, नालासोपारा या बुद्ध लेणीस भेट दिली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस. के. भंडारे यांनी भिमराव यांच्याशी चर्चा करून समता सैनिक दलाच्या वतीने देशातील प्रत्येक बुद्ध लेणी येथे समता सैनिक दलाची माघ अमावस्याला मानवंदना दिली जाईल व भारतीय बौद्ध महासभा आणि स्थानिक संघटना , समाज बांधवांनी मिळून येथे कार्यक्रम घेतला जाईल त्यासाठी कामाला लागावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेश अध्यक्ष उत्तम मगरे यांनी केले. समता सैनिक दलाची मानवंदना कान्हेरी लेणी वरील असि.स्टाफ ऑफिसर अशोक कदम, हेड क्वार्टर सचिव डी एम आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, व नालासोपारा येथील पालघर बटालियन ची मानवंदना मेजर संतोष जाधव यांनी केली. या दोन्ही लेण्यांची व कान्हेरी लेणीतील जे मा.न्यायालयाच्या आदेशाने पूर्वीच तोडलेल्या अतिक्रमणचीही पाहणी भिमराव आंबेडकर यांनी केली. त्यांच्या सोबत एस के भंडारे, उतम मगरे, रविंद्र गवई, प्रदिप कांबळे, चंदाताई कासले, विलास ढोबळे, उमेश बागुल,मोहन सावंत, वासुदेव हिवराळे, रविंद्र इंगळे इत्यादी सैनिक अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दोन्ही लेण्यांची सविस्तर माहिती गेले दहा वर्षे लेणी संवर्धनाचे काम करीत असलेले व दलाच्या लेणी संवर्धन युनिटचे डीव्हिजन ऑफिसर रविंद्र सावंत यांनी समजावून सांगितली. या कार्यक्रमास मुंबई प्रदेश, पालघर, ठाणे येथील सैनिक, कार्यकर्ते, बौध्द समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता व नालासोपारा शहर मधील बौद्ध बांधव वसई तालुक्यातील स्थानिक वसई पश्चिम नऊ गावातील भिम प्रेरणा जागृती संस्था व शाखा वसई तालुका पश्चिम चे अध्यक्ष व कार्यकारिणी आणि नऊ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *