
नालासोपारा(प्रतिनिधी) फीस संदर्भात कुठलीही सवलत न मिळाल्याने नालासोपारा पूर्वे कडील सेंट अलॉयसीस शाळेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन केले.मुख्याध्यापक व शाळा प्रशासन यात सविस्तर चर्चा करण्यात आली परंतु फीस संदर्भात कुठलाही सकारात्मक निर्णय न होऊ शकल्याने पालक व मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले.विध्यार्थी वर्गानीं ज्या गोष्टीचा लाभ घेतलाच नाही तर फीस घेण्याचा कुठल्याही शाळेला अधिकार नाही या मुद्द्यावर ठाम राहत मनसे पदाधिकारी यांनी प्रशासनाला भरपूर झापले.मनसेचे नालासोपारा शहर सचिव श्रीधर पाटेकर व उपशहर अध्यक्ष संजय मेहरा यांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील शाळेने कानाडोळा केल्याचा रोष व्यक्त केला.सदर शाळेवर कारवाई करण्यात यावी या करिता मनसेचे शहरअध्यक्ष प्रवीण भोईर यांनी पालकांना घेऊन तुळींज पोलीस निरीक्षक यांची भेट घेत शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्यांनी गटशिक्षण अधिकारी व शाळा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन येत्या २ दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहरसचिव राज नागरे. शहरसंघटक हरिश्चंद्र सुर्वे उपशहरअध्यक्ष विकास जैतापकर. विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अमित नारकर. कैलास पवार. महिला उपजिल्हाध्यक्षा श्रद्धा राणे यांनी केले. यावेळी दर्शना पाटील.अक्षता सुर्वे. प्रज्ञा जाधव. राकेश लोखंडे.कल्पेश सावंत. शाखाअध्यक्ष संतोष गुरव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
