

इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन तर्फे कुमारी क्रिशा प्रकाश गडा हिला उत्कृष्ट अभिनय चा पारितोषिक…
मुंबई
काल शौर्य पुरस्कार विजेते अनेक पुरस्काराने सन्मानित शिक्षण क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत असणारी बांधिलकी जपणारे वर्दीचा थोडा दंभ नसणारे माननीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री एकनाथ खोल्लम साहेब यांचे आपले सेवेतून आलेल्या अनुभवातून वर्दी या पुस्तकाचे दिमागदार अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत आणि काल मेगा ब्लॉक असूनही आणि चाहत्यांनी उपस्थिती दर्शवून सोहळा मुंबई पत्रकार परिषद , लोकमान्य भवन या इमारतीत पार पडला.
माननीय ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार श्री सुरज भोईर सर यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिनेत्या नयना आपटे, तसेच सेवानिवृत्त अधिकारी व मोटिवेशनल, चित्रकार, पत्रकार, समाजसेवक असे अनेक समाजाचे बांधिलकी असणारे दिग्गज लोक उपस्थित होते. माननीय एकनाथ खोल्लम व प्रमुख अतिथी यांनी आपले त्यांच्याविषयी मत व आदर व्यक्त केला. तसेच कार्यक्रम मध्ये कुमारी क्रिशा प्रकाश गडा हिने पोलीस च्या वेषात अभिनय खूप छान आणि समाजाला प्रेरणा देणारा होता.