

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा (१७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२) आज जिल्हा परिषदे मार्फत जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा विहित कालावधीमध्ये निपटारा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित अर्ज/ तक्रारी यांचा निपटारा करणे करिता दि.१७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आदेश, एतदर्थ मंडळाची मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सवलतीचे आदेश , अधिसंख्य पदावरून नियमित आस्थापनेवर सेवावर्ग केल्याचे आदेश वाटप करण्यात आले. शिक्षक संवर्ग, आरोग्य कर्मचारी तसेच सामान्य प्रशासन संवर्गातील कर्मचारी यांना हे आदेश देण्यात आले.
तसेच केळवे ग्रामपंचायत येथे अपंगांना UDID कार्ड, जन्ममृत्यू दाखले, रहिवासी दाखले असे २० लाभार्थ्यांना वाटप दाखले वाटप करण्यात आले.
या कालावधीत कालबद्ध पद्धतीने नियोजन करून प्रलंबित अर्जाचा निपटारा करून नागरिकांच्या समस्या प्रश्न मार्गी लावले पाहिजेत तरच या सेवा पंधरवड्याला न्याय दिल्यासारखे होईल.असे मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
या कार्यक्रमाच्या वेळी उप.मु.का.अ.(सा.) संघरत्ना खिल्लारे, उप.मु.का.अ.(पंचायत) चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, कार्यक्रम अभियंता बांधकाम नितीन भोये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, शिक्षणाधिकारी संगीता भागवत तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.