

दिनांक 17 जुलै 2019 रोजी दुपारी दीड वाजता ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया यांनी 25 ट्रॅक्टर मध्ये 300+ लोक घेऊन उंभ्भा गावातील स्थानिक अदीवासी वर गोळीबार केला त्यात दहा लोक मृत्यू झाले.
17 जुलै 2019 रोजी दुपारी दीड वाजता घोरवाना कोतवाली क्षेत्रांमधील उंभ्भा गावात जमिनीची मोजणी होणार होती त्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी ग्राम प्रधान यज्ञदत्त भूर्तिया 25 ट्रॅक्टर मध्ये 300 हून अधिक लोक व एका बुलेरो मध्ये 8 रायफल घेऊन तसेच काठी दांडी घेऊन कब्जा करण्यासाठी गेला होता गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली त्याचवेळी बोलेरो मधील लोकांनी आदिवासींवर त्या 8 रायफलमधून तीस मिनिटं गोळीबार केला यामध्ये दहा स्थानिक अधिवासांचा मृत्यू झाला तर कित्येक आदिवासी जखमी झाले.
नक्की काय आहे सोनभद्रा प्रकरण
सोनभद्रा प्रकरणाचे दिल्ली बिहार कनेक्शन
सोनभद्रा मध्ये घडलेले प्रकरण 50 एकर जमिनीसाठी भू-माफिया आणि अधिकाऱ्यांच्या दबावामुळे घडल. आदिवासींनी आपल्या स्थानिक जमिनीवरती हक्क दाखवून तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला म्हणून ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया यांनी नरसंहार केला.
जर सरकारने निपक्ष पणे तपास केला तर उंभ्भा गावातील या दोन करोडच्या जमिनीसाठी कित्येक अधिकारी दोषी ठरतील.
कारण ही जमीन ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया यांनी एका आयएएस (IAS) परिवाराकडून विकत घेतली होती. तर 1940 पासून आदिवासी लोक त्यावर शेती करत होतेे.
17 डिसेंबर 1955 ला बिहारच्या मुजफ्फर मधील निवासी महेश्वरी प्रसाद नारायण सिंन्हा यांनी एक आदर्श कोऑपरेटिव सोसायटी बनवून ही जमीन नियमांच्या विरुद्ध जाऊन सोसायटीच्या नावावर ती केली.
स्थानिक तहसीलदारांना सोबत घेऊन 215 दोनशे पंधरा एकर जमीन सोसायटीच्या नावावर ती केली.
त्यानंतर महेश्वरी ने आपल्या आयएएस (IAS) जावयाच्या मदतीने रॉबर्टगंजच्या तहसीलदाराच्या मदतीने सोसायटीची 50 एकर जमीन आपली मुलगी अशा मिश्रा व बायको प्रभात कुमार मिश्रा (पटना बिहार) यांच्या नावे केली.
त्यानंतर ही जमीन अशा मिश्राने तिची मुलगी विनिता शर्मा उर्फ किरण कुमार शर्मा यांच्या नावावर केली किरण शर्मा आयएस(IAS) अधिकारी भानू प्रसाद भागलपुर त्यांची पत्नी हिच्या नावे केली.
आतापर्यंत ही जमीन आदिवासी लोक कसत असत व त्यातला काही हिस्सा या आयएएस (IAS) परिवाराला मोबाईल म्हणून देत असेत.
17 ऑक्टोबर 2017 ला किरण कुमार ने ही जमीन ग्राम प्रधान यज्ञदत्त भूर्तिया याला सुमारे दोन करोड रुपयाला विकली स्थानिक आदिवासींनी याला विरोध केला पण पोलीस व प्रशासन गावांचा ऐकत नव्हते पोलीस हे ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया याला सहकार्य करत होते.
ग्रामप्रधान यज्ञदत्त भर्तिया त्याच दरम्यान जमीन कब्जा करण्यासाठी किती प्रयत्न करत होता परंतु गावाच्या विरोधामुळे त्याला ते शक्य होत नव्हते.
प्रशासनाने स्थानिक आदिवासींच्या सांगण्यावरून वेळीच ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तियावर कारवाई केली असती तर इतका मोठा नरसंहार करण्याची हिंमत झाली नसती.
पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याने ग्राम प्रधानाने एवढा मोठा नरसंहार केला आहे.
जमिनीची मोजणी होत असताना नक्की काय घडलं
ज्या वेळेला गावच्या जमिनीची मोजणी होती ती त्याच वेळी ग्रामप्रधान यज्ञदत्त भूर्तिया 25 ट्रॅक्टर मध्ये जवळ जवळ 300+ लोक एका बोलेरो मध्ये 8 रायफल घेऊन मोजणीच्या ठिकाणी पोहोचला व जमिनीवर कब्जा करू लागला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारीला सुरुवात झाली याच वेळी बोलेरे मध्ये असलेलेल्या लोकांनी रायफलमधून फायरिंग सुरू केले तीस मिनिटांमध्ये गेलेला फायरिंग मध्ये 26 गोळ्या झाडल्या गेल्या यामध्ये ते 10 आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला व कित्येक जखमी झाले.
गोळीबार सुरू असताना पोलीस घटनास्थळी पोचले त्यावेळी 5 आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला होता. परंतु पोलीस आल्यानंतरसुद्धा या लोकांनी आदिवासी जनतेवर ती गोळीबार सुरूच ठेवला यज्ञदत्त भूर्तियाच्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होते.
¤ काय चुकी होती आदीवासी बांधवांची, हक्क मागने चुक आहे का ??
¤ नक्की देशात संविधानाची अंमलबजावणी होते का ??
¤ न्याय हक्कासाठी आवाज उठवायचा की मरणाच्या भीतीने गप्प बसुन राहायचे ??
¤ पोलीस इतके शस्त्र घरात ठेवणाऱ्यांवर कारवाई करत नाही व विचारवंतांना गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यात धन्यता मानतात.
¤ मग प्रश्न पडतो नक्की पोलीस हे सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी आहेत की गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी ??
परिवर्तन लढा….एक क्रांतीची चाहूल
9503861006
सुशांत पवार