


दि. ६ मार्च २०२०. पालघर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी नेहमीच नवनविन उपक्रम राबविणार्या सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धांमधे मुख्यत्वे क्रिकेट, बँडमिंटन, टेबल टेनिस व कँरम ह्या खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणाची सवय व्हावी, खेळांद्वारे होणाऱ्या शारीरिक तंदुरुस्तीची अनूभूती मिळावी तसेच संघ भावना वाढीस लागावी ह्या हेतूने क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.
ह्या स्पर्धांमधे विधी शाखेच्या आनेक विद्यार्थी – विद्यार्थीनींनी भाग घेत स्पर्धेला अधिकच रंगत आणली. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांचे सामने अतिशय चुरशीचे झाले. ह्या स्पर्धेदरम्यान पार पडलेले क्रिकेटचे सामने अत्यंत उत्कंठावर्धक ठरले व प्रेक्षकांमधे कमालीचे लोकप्रिय ठरले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात तृतीय वर्ष विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी द्वीतीय वर्ष विधी शाखेच्या संघाचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. द्वीतीय वर्ष वीधी शाखेच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपुर्ण क्रीडा स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे आयोजक समितीने आभार मानले. तसेच सर्व पंच आणि स्वयंसेवकांनाही चोख कामगिरी बजावल्याची पोचपावती दिली.