

आज दिनांक २३/११/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेले सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय,दोन वर्षांच्या यशस्वी घौडदौडीनंतर आज तिसऱ्या पर्वाच्या प्रवासात सामील झाले.
दांडेकर विधी महाविद्यालयाने गेले दोन वर्षे विधी शिक्षणांसोबत विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
पालघर जिल्ह्यातील विधीशिक्षणाच्या पायाभरणीत दांडेकर विधी महाविद्यालयाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळेच तिसऱ्या पर्वासाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
तिसऱ्या तुकडीच्या अनावरण कार्यक्रमात
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा यांनी आपल्या मनोगतात विधी महाविद्यालयाच्या सुरूवातीपासूनच्या प्रवासाचे अनुभव वर्णन कथन केले.
तदनंतर उपस्थित विद्यार्थ्यांना विधी शाखेच्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल सखोल मार्गदर्शन,विधी शाखेचे बदलते स्वरूप,विधी शाखेतील उपलब्ध संधी याबाबत विस्तृत माहिती दिली.
सदर कार्यक्रमात प्राचार्य तसेच उपस्थित विधी शिक्षकांमार्फत दांडेकर विधी महाविद्यालयाची कार्यपद्धती,सुचना, नियमावली मार्गदर्शक तत्वे आदी बाबी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नवीन विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत सोहळा उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पार पाडण्यासाठी प्रो.दिशा तिवारी,प्रो.उत्कर्षा जुन्नकर,प्रो.राधा मित्रा,प्रो.विनोद गुप्ता,प्रो.प्रिया तांडेल यांचे बहुमूल्य योगदान विद्यार्थ्यांना लाभले.
‘नवे पर्व, नवे उपक्रम आणि नवे चैतन्य असेच उजळत राहो’ या सुंदर विचाराने कार्यक्रमाची सांगता झाली.