
काल दिनांक २७/०२/२०२२ रोजी *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार बहुजन हृदय सम्राट ऍड. मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. अरुण सावंत साहेब व पालघर जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे व पालघर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.रेखाताई अवचार यांच्या मार्गदर्शनाखालीवंचित बहुजन आघाडी नालासोपारा (पुर्व) वॉड क्रमांक-८२ येथे सौ.रेणुका सचिन जाधव यांच्या विद्यमाने वंचित बहुजन आघाडी व यशस्विनी प्रतिष्ठान महिला बचत गट व वार्ड क्रमांक ८२ यांच्या करीता भव्य हळदी कुंकू व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी नालासोपारा पुर्व वॉर्ड क्रमांक ८२ चे अध्यक्ष आयु. सचिन आनंद जाधव व सौ.दुर्गा कांबळे मॅडम, स्नेहलता कनोजिया मॅडम, गुडिया सोनी, जितू परमार, सुजित रजक, सचिन झगडे,प्रदीप पांडे यांनी स्वीकारली.
हळदी कुंकू व स्नेहमेळावा,लहान मुलींचे व महिलांचे नृत्य स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ.रेखाताई अवचार पालघर जिल्हा महिला अध्यक्ष , आयु. सुप्रेश खैरे पालघर जिल्हा प्रभारी, बिंदु जी तृतीय पंथी , विरार पूर्व युवक कार्यकर्ते सुविध पवार, समीर मोहिते व वसई शहर पूर्व शहर सचिव जावेद खान व त्यांचे कार्यकर्ते , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम हा भव्य दिव्य व यशस्वी स्वरुपात पार पडला.