

सौ. सुनंदा बाजीराव खराते यांना मिळाला वसई तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती पुरस्कार
सौ. सुनंदा बाजीराव खराते मॅडम ह्या अंगणवाडी केंद्र (कातकरीपाडा) चंदनसार, विरार पूर्व येथे मागील 36 वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कामांमधील प्रामाणिकपणा व जनमाणसांतील उत्तम संपर्क यामुळे सौ.खराते बाई (मॅडम )या नावाने त्या प्रसिद्ध आहेत.तसेच त्यांच्याकडून शाळेतील व परिसरातील अनेक विद्यार्थी व युवा वर्ग भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी व पुढिल वाटचालीसाठी मार्गदर्शनाकरिता येत असतात. आज त्यांच्या विद्यार्थ्यांची मुले देखील त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांनी आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून यापूर्वी त्यांना ठाणे जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून 2014 मध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आणि आता तालुकास्तरीय आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती हा पुरस्कार मिळाला आहे.