
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक स्मशानभुमी आहेत व ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करीत असतात.स्मशानभूमी मधे अनेक प्रेत अंत्यविधी साठी आणले जातात व त्यांची अंत्यविधी करण्याचे काम हे कर्मचारी करतात.सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम ठेकेदार तसेच महापालिका करीत आहे.ह्या कर्मचाऱ्यांना करोनापासून बचावासाठी कुठलीही साधने ठेकेदार किंवा महापालिकेने उपलब्ध करून दिलेली नाहीत.ठेकेदारांकडुन ह्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जाते हे आगोदर सुद्धा मी वसईकर अभियान यांनी पत्राद्वारे महापालिकेच्या कार्यालयाला वारंवार कळविलेले होते.
तरी देखील स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना मास्क,सेनेटायजर,गम बूट व इतर साहित्य ठेकेदारांना पुरविण्याचे आदेश देऊन आधीच्या ठेकेदारांकडून महापालिका व कर्मचाऱ्यांची होणारी लूट ह्या पत्रानुसार सुद्धा कारवाई करण्यात यावी असे विनंती महापालिकेचे आयुक्त यांना मी वसईकर अभियान यांनी केले.